दहावी बारावीच्या परीक्षा जाहीर...

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( उदय नरे ) :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणा-या दहावी बारावीच्या परीक्षेची तारीख शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केली. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दिनांक 23 एप्रिल 2021 ते दिनांक 29 मे 2021 च्या कालावधीत घेण्यात येणार आहे. इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. 


शालांत परीक्षा इयत्ता दहावीची लेखी परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल व दहावी परीक्षेचा निकाल आँगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

कोव्हीड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 


कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे व त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे असे शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 


या पत्रकार परिषदेस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचीव श्रीमती वंदना कृष्णा,शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. दिनकर पाटील. सहाय्यक संचालक श्री.दिनकर टेमकर उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)