राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

शालेयवृत्त सेवा
0

 



कलंबर खुर्द ( शालेय वृत्तसेवा ) :

परवाच राज्यभर संपन्न झालेल्या शाळेच्या पहिल्या दिवशी राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी लोहा तालुक्यातील कलंबर खुर्दच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी प्रवेश केला. काही घरांना भेटी दिल्या. पालक आणि गावकऱ्यांशी दर्जेदार शिक्षणाबाबत संवाद साधला. शाळेत इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रथम चॉकलेट आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे  स्वागत केले. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.  शाळेतील सर्वच वर्गातील  विद्यार्थ्यांना  पहिल्या दिवशी त्यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवी कोरी पुस्तके मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 


शाळेच्या मुख्याध्यापिका  श्रीमती संगीता बाबर यांनी माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित पालकांचेही त्यांनी  स्वागत केले.  मुख्याध्यापिका श्रीमती संगीता बाबर यांनी आपल्या प्रास्ताविकात राज्याच्या पूर्व शिक्षण संचालकांनी शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केल्याचा आनंद व्यक्त केला. आणि विद्यार्थी विकासाच्या उपक्रमाची माहिती दिली. डॉ नांदेडे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना उद्देशून केलेल्या मार्गदर्शनात आपल्या पाल्यांना केवळ मातृभाषेत शिक्षण देण्याचा सल्ला दिला. पालक प्रतिनिधी रघुनाथ देवकर यांनी आमच्या पाल्यांना मध्येच शिक्षण सोडू देणार नाही असा आश्वासक दिलासा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मुख्याध्यापिका संगीता बाबर यांनी केले तर आभार श्रीमती कविता सुरनर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)