नांदेड ( रुपेश मुनेश्वर ) :
मातोश्री रमाई जयंती निमित्त महेंद्र नरवाडे यांच्या 'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ता.२१फेब्रुवारी रोज रविवारी किनवट तालुक्यातील मातोश्री कमलताई ठमके सभागृह, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा येथे आयोजित केला आहे .
अभियंता प्रशांत ठमके साहेब तालुका अध्यक्ष,भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.आनंद इंजेगावकर, परभणी आणि डॉ.अशोक गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस,अ.भा.बौद्ध उपासक संघ व कौशल्य प्रकाशन चे प्रकाशक औरंगाबाद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.पंजाब शेरे, सुत्रसंचलन उत्तम कानिंदे व आभार रमेश मुनेश्वर माननार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश पाटील, रुपेश मुनेश्वर, उपा.सुजाता नरवाडे, प्रशांत दुथडे, प्रा.लक्ष्मीकांत दुथडे, अभि.शशिकांत नरवाडे, डॉ.प्रकाश रायघोळ, डॉ.प्रेमलता नरवाडे, तुषार नरवाडे यांनी केले आहे.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .