नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेंबोली (ता मुदखेड) येथे भेट देऊन शाळेच्या गुणवत्तेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी उप मुख्यकार्यकारी गिरी, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, गटशिक्षणाधिकरी सुरेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली आडगावकर केंद्रप्रमुख करुणा आवरगंड उपस्थित होते.
सर्व अधिकाऱ्यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत भेट दिली असता यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विविध शैक्षणिक साहित्य, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक व हस्तकला साहित्याची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक घेत असलेले परिश्रम, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.या भेटीमुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली. यावेळी मुख्याध्यापक चंपत मुनेश्वर, सर्व शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .