माहूर केंद्राचे वाचन विकसन प्रशिक्षण संपन्न...!!!

शालेयवृत्त सेवा
0

 



  

माहूर ( मिलिंद कंधारे ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर केंद्राची शिक्षण परिषद व 'मराठी वाचन विकसन उपक्रमाचे प्रशिक्षण' आज रोजी संपन्न झाले आहे.ही शिक्षण परिषद माहूर केंद्रातील जेष्ठ अध्यापक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा माहूरगड चे तालुकाध्यक्ष एस.पाटील, अध्यापक सिद्धार्थ सोनकांबळे,सुनील अंबुलकर या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी सावित्रीमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणास प्रारंभ करण्यात आला.


            प्रादेशिक विद्या प्राधिकरण आंग्लभाषा तज्ञत्व छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित मराठी वाचन विकसन उपक्रम प्रशि ।क्षण हे बारा आठवड्यांचे वाचन विकसन अभियान म्हणून दरम्यानच्या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार आहे.त्यासंबंधात या शिक्षण परिषदेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.


          तसेच या केंद्रस्तरीय संमेलनात विद्यार्थ्यांकडून करून घ्यावयाचे विवीध उपक्रम तसेच त्यांच्या समस्यांवरील उपाय व त्यांना द्यावयाचे अतिरिक्त मार्गदर्शन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी केंद्रसमन्वय डॉ. अरुण धकाते केंद्र मुख्याध्यापक संजीव वाठोरे यांच्यासह केंद्रातील समस्त मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मराठी बालभारती इयत्ता पाचवी या मराठीच्या पाठ्यपुस्तकाच्या समीक्षा सत्रासाठी बालभारती पुणे येथे निवड झाल्याबद्दल जेष्ठ शिक्षक एस.एस.पाटील यांचा सत्कार उपस्थितांच्या वतीने करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)