पुणे - स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान शिक्षिकांचा *पुणे जिल्हास्तरीय नारीशक्ति सन्मान पुरस्कार* देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती स्वरदा खेडेकर, माधुरी वेल्हाळ, प्रविणा रोकडे व आयुब शेख पुणे जिल्हा समन्वयक, सर फाऊंडेशन महाराष्ट्र यांनी दिली.
पुरस्काराचे ऑनलाइन वितरण लवकरच होणार आहे.
शिक्षिका म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन, सामाजिक कार्यातील सहभाग व कोव्हिड काळातील योगदान यांचा विचार करुन या पुरस्कारासाठी महिला शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कार विजेत्या आहेत....
१)सुनीता काटम
दौंड
२)रुक्साना शेख
इंदापूर
३)पूनम घाटगे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
४)आशा सकट
शिरूर
५)उज्ज्वला कटकदौंड
मुळशी
६)सुजाता जाधव
बारामती
७)मनिषा कुऱ्हाडे
जुन्नर
८)पुष्पा घोडके
मावळ
यांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल सर फाऊंडेशनचे महिला राज्य समन्वयक सौ. हेमा शिंदे(वाघ), राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .