नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद के प्रा शा सुगाव या शाळेने शासनाने ठरवून दिलेल्या नऊ निकषांची पूर्तता केल्यामुळे या शाळेला तंबाखूमुक्त शाळा म्हणून दि.27मार्च 2021 रोजी प्रमाणपत्र मिळाले असून सदरील शाळेस तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तसेच भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार परिपत्रक काढले आहे .
या परिपत्रकानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेत व संस्थेच्या परिसरात तंबाखूचा प्रचार ,प्रसार व वापरास आळा घालण्यासाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम या विषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी शासनाने नवीन निकष ठरवून दिलेले आहेत. शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, गट संसाधन केंद्र, सलाम फाउंडेशन व प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी यांच्या मुख्य प्रेरणेमुळे गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली जी.एस.मंगनाळे केंद्रीय मुख्याध्यापक यांनी कार्य केले. या कामी शिक्षण विस्तार अधिकारी के. के.फटाले, तंबाखुमुक्त जिल्हा समन्वयक रवी ढगे, केंद्रप्रमुख टी .पी.पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी करायचेच ठरवले तर नक्कीच पाच दिवसांच्या आत शाळा तंबाखूमुक्त होते. असे मत जी.एस.मंगनाळे, केंद्रीय मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.
सदर शाळा त॔बाखूमुक्त झाल्याबद्दल जि .प. सदस्य संगीता सुभाष गायकवाड, पं. स. सदस्य सतीश पाटील उमरेकर , सरपंच विमलबाई काशीराम गायकवाड, उपसरपंच विजय पाटील जाधव, माजी सरपंच दिलीपराव पाटील जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाटील जाधव, उपाध्यक्ष रामदास पाटील जाधव आदींनी शाळेचे मुख्याध्यापक जी.एस. मंगनाळे, सहशिक्षक किरण राठोड, जयराम पाटील, राजेंद्र तलवारे, शिवनंदा मुदखेडे यांचे अभिनंदन केले आहे.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .