आज जागतीक महिला दिन.महिलांचा गौरव करण्याचा दिन."स्री ही अनंत काळाची माता व क्षणभराची पत्नी आहे"विविध क्षितीजाला गवसणी घालून अनेक क्षेत्र काबिज केली.जगण्याच्या सर्व स्पर्धा लिलया जिंकल्याही.वर्चस्ववादाची लढाई तिने जिंकली.विचारानेच नाही तरआचाराने भावनेने ही मुक्त झाली.
एकेकाळी चुल,मुल,चार भिंतीत बंदिस्त असलेली,संस्कार,संस्कृतीने बांधले गेलेली,चारित्र्याच्या सिमिनेआणि सुरक्षा या गोंडस नावाखाली बळी गेलेली स्री.स्री पुरुष समानता हा संस्कारच नव्हता.स्री म्हणजे मुलं जन्माला घालण्याचे यंत्र समजले जात असे.प्रत्येक पुजेत यजमानाच्या हाताला स्पर्श करुन मम म्हणारी स्री.भावनेचा कोंडमारा सहन करत,स्वअस्मिता,स्वभाव यांचा बळी देणारी स्री.कालचा समाज तिला तुच्छ लेखायचा.माणुस म्हणुन तिला जोपासल गेलं नाही.तिच्या विचाराला अस्तित्व नव्हतचं मुळी.संसारच्या अग्निदिव्यातुन जाताना स्वताःच्या स्वप्नांचे सिमोल्लंघन करत जगायची.दारातला कुत्र्याला ईमानी म्हणून,गोठयातल्या जनावरांना कष्ट करतात म्हणून दया दाखविणारा समाज, घरासाठी मरमर राबणार्या स्रीला गुलाम म्हणुनच समजायचा.रावणाने पळवली म्हणुन सितेच्या चारित्र्यावर डाग ठेवणारा धोबी आणि ति पवित्र आहे हे सिध्द करण्यासाठी तिची अग्निपरिक्षा घेणारा राम.बळी सिताचा नाही तर समाजाचे उत्थापन(पुनर्रनिर्माण) करणार्या स्री शक्तीचा गेला.राम राजा होता,सितेच्या शिलावर डाग ठेवणार्या धोब्याला शिक्षा सहज रामाला देता आली असती,पण समाजाने रामाला दोषी धरल असत?कारण धोब्यासारख्या छोट्या व्यक्तिला न्यायप्रिय रामाने सत्तेचा गैरवाफर करुन शिक्षा केली.आणि दुर्लक्ष करावे तर शिलवान व नितीवान राजाने परपुरुषाकडे राहिलेल्या सितेला स्विकारले,हा आरोप समाजाने ठेवला असता.म्हणुन रामाने सितेला अग्निपरिक्षा दयाला लावली.पण एकटी सिता नाही तर स्री बदनाम झाली.एवढ करुनही राम श्रेष्ट ठरला.सितेला जमिनीत गाढून घ्यावे लागले.बी स्वःताला जमिनीत गाडून घेत म्हणुनच त्याचा वटवृक्ष होतो.सितेनेही स्री चारित्र्यासाठी स्वःताला जमिनीत गाडून घेतले.अन्याय सहन करणारी गुलाम असणारी स्री सुखी होती.
काळ बदला,वेळ बदली,परिस्थितीही बदली.स्री शिक्षणासाठी सावित्रीबाईनीं लढा दिला.प्रतिकुल समाज व्यवस्थेत स्री सक्षम उभी करण्याचे काम सावित्रीबाई, फुले ,शाहू ,आंबेडकर यांनी केले.स्वातंत्र्यानंतर स्री संरक्षणाचे कायदे झाले.स्री शिकली,स्वतंत्र झाली पण सक्षम झाली का?आज अनेक क्षितिजे तिने पादाक्रांत केली.अनेक दिशानां गवसणी घातली.पण तरीही ती सुखी झाली का? हा प्रश्न उरतोच.स्री स्वातंत्र्य व स्री समानता वेगवेगळे विषय आहेत.अनेकांना स्री स्वातंत्र्य म्हणजे स्री समानता वाटते.स्री जर खरचं स्वतंत्र असेल तर वकिल झालेली स्री भरपुर हुंडा देवुन वकील नवरा करते.पण कायदा शिकूनही हुंडा घेणार्या समाजास सवाल विचारात नाही.स्री समानता व स्वातंत्र्य फक्त मुलींच्या सुखापुरती मर्यादित झाली आहे.लग्न झाल्यानंतर सासरकडील मंडळी वारंवार मुलीच्या मनावर तिला माहेरी सोडत असतील तर मुली व तिच्या नातेवाईकांना सासरवाडीकडील मंडळी स्री समानता मानतात असे वाटते.जर तसे होत नसेल तर सासरवाडीकडील मंडळीवर कौंटुंबीक हिंसाचार केसेस दाखल होतात.म्हणजेच समानतेची व्याख्या सोयीनुसार वापरली जात आहे.बलात्कार,विनयभंग आजही मोठया प्रमाणात वाढलेत. स्री षुरुषात भेद घर शाळेपासुन केला जातो.शाळेत मुलांच्या रांगेत,बाकड्यावर मुलींनी बसायचे नाही इथपासुन त्यांच्या वापरण्याच्या वस्तु पर्यत भेदभाव करतो.मग स्री स्वातंत्र्य व समानतेची अपेक्षा पुर्ण कशी होणार?
काही ठिकाणी स्री स्वातंत्र्याचा स्वैराचार होताना दिसतो.स्रीयासाठी संरक्षण म्हणुन तयार केलेल्या कायद्याचा वापर स्रियां दलाली,खंडनी वसुलीसाठी,धमकाविण्यासाठी करतात.कौंटुंबिक हिंसाचाराची ९०% प्रकरणे बोगस निघतात.हे कशाचे द्योतक आहे.शेवटी अशा खोटया केसेस करणार्या स्रीयावर वचक ठेवण्यासाठी सरकारला कायद्यात दुरुस्ती करावी लागली.कौंटुंबिक हिंसाचार व बलात्कार,विनयभंग या तक्रारी खोटया निघाल्यानंतर स्रीयांनाही शिक्षेची तरतुद सुधारित कायद्यात केली आहे.बलात्कार झाल्यानंतर तिची जात समोर आणुन काही घटक समाजमनं दुषित करतात,पण जिच्यावर बलात्कार होतो तिला न्याय मिळतो का? आजही हा प्रश्न उरतोच.बलात्कार सिध्द होईपर्यंत तिच्यावर मानसिक, भावनिक बलात्कार निरंतर चालु असतो, त्याचे काय?नंतर ही समाज तिला सन्माने स्विकारतो का? ज्या दिवशी तो स्विकारेल त्या दिवशी खर्या अर्थाने स्री स्वतंत्र झाली, समानता आली व सामाजिक न्याय सन्मानाने मिळाला असा त्याचा अर्थ होईल.त्या दिवशी खरा जागतिक महिला दिन असेल.
जागतिक महिला दिनी झगमगित समारंभात,चकचकित कपडे घालुन चमचमित बोलुन भाषणं ठोकणार्या स्री यांचा सन्मान केला जातो.संर्घष,दारिद्रयता,प्रचंड मेहनत करणार्या स्रीयांचा गौरव कधी होणार?रस्त्यावर दगड फोडणारी,बांगड्या भरणारी,शेतातं रक्त ओतुन मातीतुन मोती पिकवणारी,लोहार्याच्या भात्यात स्वताःला सिध्द करणारी "ऐरणिच्या देवा तुला ठिणगी,ठिणगी वाहू दे,आभाळागत माया तुझी आम्हांवर राहु दे" असे म्हणारी घिसाडिन यांचा गौरव होईल त्याच दिनी सामाजिक न्याय फलद्रुप झाला असे म्हणता येईल.हल्ली मुलगी झाल्यावर हत्तीवरुन साखर,पेढे वाटणारी कुंटुंबे त्याच मुलीचे लग्न झाल्यावर फाजिल लाड केल्यामुळे अतोनात मुलिंच्या संसारात हस्तक्षेप करतात.आणि एके दिशी तिचा संसार तोडतात तेंव्हा कोठे असतो सामाजिक न्याय व समानता?
स्री स्वातंत्र्याच्या नावाखाली ओंगळवाण प्रदर्शन करत अंग उघड पाडण्याची फॅशन झाली आहे.यावर बोलायचे म्हणले की सनातनी, धार्मिक,कर्मठ,षुरुषी मानसिकता असले आरोप होतात.पण समानता ही कपडे,खाणे आणि शिक्षण व नोकरी या पुरते मर्यादित झाले आहेत.सामाजिक सोडा पण भावनिक,मानसिक,अर्थिक समानता येईल त्या दिवशी खरा जागतिक महिला दिन असेल.महिला दिनाच्या निमित्ताने सगळयांना शुभेच्छा!
-श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर
मु.पो.काटी ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद
भ्रमणभाष्य ९७६४५६१८८१



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .