किनवट/माहूर तालुक्यातील शिक्षकांना S14 एकस्तर वेतन श्रेणीसाठी शिक्षक संघाचा यशस्वी पाठपुरावा !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
आदिवासी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना (S14) एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करणे बाबत शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, उपशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड , उपशिक्षणाधिकारी प्रज्ञा अभ्यंकर यांना देण्यात आले आहे.
संदर्भ देण्यात आले :
1). सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. टिआरएफ-2000/प्र.क्र.3/ बारा मुंबई दि. 06.08.2002
2). वित्त विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक क. वेपर-2019/प्र.क्र.15/सेवा-9 मुंबई दिनांक 14.05.2019*
3). सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. एसआरव्ही-2022/प्र.क्र. 48/ कार्यासन-12 मुंबई दिनांक 29.02.2024
4). मा. संचालक,लेखा व कोषागारे, महाराष्ट्र, मुंबई यांचे पत्र क्र. संलोको/कोषा/सलेअ-1/नस्ती क्र.14/प्रोत्साहन भत्ता/2025/106, दिनांक 18.02.2026
5). मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांचे0 शुध्दीपत्रक क्र. जिपना/शिक्षण/प्राथ/लेखा-3/193/2025, दिनांक 29.09.2025
6). मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचे पत्र क्र. कार्या-1/पीई-2/462/20257) अहिल्यानगर दिनांक-स्वाक्षरीत नमूद.*
7)मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे पत्र क्र. कार्या-1/पीई-/879/2026 चंद्रपूर दिनांक- 16/04/2026 स्वाक्षरीत.
वरील विषय विनंतीपूर्वक संघटनात्मक निवेदन सादर करण्यात येते की, नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील शिक्षक कर्मचारी यांना (S14)एक स्तर वेतन श्रेणी मंजूर करणे, लाभ देण्यात यावा. अशी आपणास संघटनात्मक विनंती करण्यात येते.यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शिवाजी शेटकर जिल्हा कोषाध्यक्ष रामदास केंद्रे, जिल्हा कार्याध्यक्ष राजीव सावरकर,जिल्हा सल्लागार गणेश कोकुलवार, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष चैतन्य उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव पाटील वर्ताळे, जिल्हा संघटक गोवर्धन राठोड, मुदखेड तालुकाध्यक्ष दशरथ गायकवाड, कंधार तालुका उपाध्यक्ष संभाजी केंद्रे, नायगाव तालुका उपाध्यक्ष मोहम्मदखान आत्तार आदींच्या उपस्थिती स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.
तसेच सदरील निवेदनासोबत आतापर्यंत मिळालेल्या राज्यातील आदिवासी जिल्ह्यांना (S14) एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे.अशा सर्व जिल्ह्यांचा संदर्भ देऊन आपल्या किनवट व माहूर तालुक्यातील शिक्षकांना सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीने न्याय मिळाला पाहिजे यासाठी साहेबांसोबत खालील विषयावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली. निवेदनासोबत लाभ मिळालेल्या जिल्ह्यांच्या आदेशाचे संदर्भ पत्र जोडले असे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
१)नाशिक चंद्रपूर या जिल्ह्यात एस१३ शिक्षकांना एस १४ लाभ मिळते तर आपल्या जिल्हा परिषद मध्ये का नाही मिळत?
२)एवढे संदर्भ एवढे पुरावे असताना आपल्या इथे हा लाभ का देण्यात येत नाही.
३)किनवट माहूर तालुक्यातील या संदर्भात मार्गदर्शन मागवले पण आपल्या जिल्हा परिषदेने अजून सुद्धा मार्गदर्शन दिले नाही.
असे तीन प्रश्न जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष चैतन उबाळे यांनी विचारले. साहेबांनी तात्काळ इंडोसमेंट मारून हे पत्र eo कडे फॉरवर्ड केले व मी लक्ष घालून हे काम करतो असे आश्वासन दिले. लवकरच शिक्षणाधिकारी मॅडम यांच्यासोबत चर्चा करून हा विषय कसा निकाली काढता येईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असे साहेबांनी यावेळी सांगितले. मा.उपशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड सरांनी सुद्धा मी किनवट माहूर कडे काम केलेला आहे त्या शिक्षकांना एक सर्व वेतनश्रेणी दिली पाहिजे या मताचा आहे. तसेच शिक्षणाधिकारी मॅडम सोबत चर्चा करू करू असे सांगितले. उपशिक्षणाधिकारी प्रज्ञा अभ्यंकर मॅडम यांनी सुद्धा मॅडम सोबत चर्चा करून आपला प्रश्न हा निकाल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .