मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली जिल्हातील विविध शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधीची ऑनलाईन बैठक..

शालेयवृत्त सेवा
0


सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी साहेब यांनी सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक घेतली. मा.शिक्षणाधिकरी विष्णू कांबळे, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे व सर्व संघटना जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक संपन्न झाली.


बैठकित खालिल प्रमुख मुद्दे चर्चिल्या गेली..


◼️कोव्हिड 19 विरुद्ध लढाईत सर्व शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.शिक्षकांच्या योगदानाबद्दल या काळात कर्तव्य बजावलेल्या सर्वांना मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या सहीने प्रमाणपत्र देण्यात येईल.


◼️कोव्हिड 19 संदर्भात ड्युटीचे आदेश रोटेशन पद्धतीने देण्यात येतील.तसेच सदर आदेश गटविकास अधिकारी यांच्या सहीने दिले जातील. ग्रामस्तर अधिकारी यांच्या सहीने आदेश दिले जाणार नाहीत.याबाबत आजच आदेश दिले जातील.


◼️ज्या शिक्षकांचे लसीकरण राहिले आहे त्यांची यादी एकत्र करून सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण केले जाईल.


◼️कारोना कर्तव्य बजावताना शिक्षक कोरोना बाधित झाल्यास त्यांना बेड उपलब्ध होण्यासाठी समन्वयक अधिकारी यांची नेमणूक केली जाईल.याबाबत संबंधित समन्वयक अधिकारी यांचा संपर्क क्रमांक दिला जाईल.


◼️कर्तव्य बजावताना कारोना ने मृत्यू झाल्यास त्यांचे विमा प्रस्ताव  विहित नमुन्यात सादर करण्याबाबत तसेच अनुकंपा अंतर्गत पात्र प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील.


◼️सुट्टीच्या कालावधीत कोरोना कार्य केलेल्या दिवसांची अर्जित रजा देण्यासंदर्भात चर्चा करून निर्णय होणार.


◼️कोरोना कार्यासाठी मदत म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला निधी उभा करून दिला जाणार.


◼️विज्ञान विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देण्या संदर्भात असणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्याचा विचार .... शासन आदेशानुसार कार्यवाही करण्याची मागणी. लवकरच निर्णय होणार.


◼️केंद्रप्रमुख पदोन्नती सुद्धा लवकरच काढली जाणार.


◼️पगार बिले ट्रेझरी ला मंजुरीसाठी पाठविण्यात आली असून लवकरात लवकर पगार करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार.

               

        अशाप्रकारे कोरोना योद्धा शिक्षकांना येणाऱ्या अडचणी  मुख्य कार्यकारी अधिकारी  सन्माननीय जितेंद्र डूडी साहेब यांनी विविध संघटना प्रतिनिधींकडून सविस्तर ऐकून घेतल्या.  अमोल माने जिल्हाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली, अमोल शिंदे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली सह विविध संघटनेचे पदाधिकारीनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)