( 31 मे: जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त रवी ढगे यांचा लेख देत आहोत - संपादक )
जागतिक तंबाखू मुक्त दिन हा जागतिक आरोग्य संघटनेने 1988 सालापासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी ’वर्ल्ड नो टोबॅको डे’ पाळला जाईल अशी घोषणा केली. या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेला 40 वर्षे पूर्ण होत होती म्हणून हा दिवस ठरवण्यात आला, परंतु काही कारणास्तव हा दिवस बदलण्यात आला आणि 31 मे म्हणजे आजचा दिवस होय.
मागील वर्षीपासून जगाला कोरोना (कोविड-19) ह्या संसर्गजन्य महामारी या रोगाने जग बंद केले आहे. हा आजार पसरण्याचे माध्यम नाक व तोंडावाटे जर कोरोनाचा विषाणू शरीरात गेला तर व कोरोनाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला तर त्यामुळे सर्वांनी त्रिसूत्री पाळणे आवश्यक आहे यात हात स्वच्छ धुणे, 3 मीटर सामाजिक आंतर पाळणे, तोंडाला चांगल्या प्रतीचे मास्क वापरणे. आज मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकांना तंबाखू व धूम्रपान यांच्या सारख्या वाईट सवयीने जणू गुलाम केले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक उघडयावर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे धुम्रपान करताना आढळतात.
कायदा आहे पण अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. जर एखादा कोरोना रुग्ण तंबाखू खाऊन थुंकला तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे शासनाने संदर्भांत सर्वत्र तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकणार्या पानटपर्या गेल्या अनेक दिवसांपासून ब्रेक द चैन अंतर्गत बंद केले आहेत. त्यामुळे सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. यात काही जणांनी तर तंबाखू मिळत नसल्यामुळे तंबाखू खाणे सोडून दिले आहे, तर काही जणांना धुम्रपान करण्याची सवय होती तीसुध्दा या संसर्गजन्य रोगामुळे सोडून द्यावी लागली आहे. तसेच या कोरोनाच्या दुसर्या लाटेत मोठ्या प्रमाणावर 25 ते 50 वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यात ज्या व्यक्तीला पूर्वीचा कोणताही आजार असेल तर तो आजार ह्या कोरोनाच्या विषाणूमुळे रौद्ररुप धारण करून त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे मृत्यूकडे नेताना आपण पाहत आहोत. त्यामुळे आपण ह्या सर्व वाईट सवयी सोडणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर ही महामारी तंबाखू, धुम्रपान करणार्या लोकांचे मृत्यू वाढवणारे दिसत आहे.
केंद्र सरकारने आता उशिरा का होईना हा दावा मान्य करत कोरोनाबाधित रुग्णांचे एअरोसोल्स 10 मीटर दूरवर हवेत पसरू शकतात, तर ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत पसरू शकतात असं कबूल करत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोनाबाधित व्यक्तीची लाळ आणि नाकातून, शिंकेद्वारे बाहेर पडणारे थेंब श्वास घेताना अथवा बोलताना, गाताना, हसताना, खोकताना बाहेर पडल्यामुळे कोरोना व्हायरस वाढते. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्या बाधित व्यक्तीकडून देखील कोरोना व्हायरसचा फैलाव होतो. हे ध्यानात ठेवून लोकांनी मास्क वापरणे चालू ठेवावे, एकावर एक असे दोन मास्क किंवा एन-95 मास्कचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. यावरून उद्याचा काळ आपल्याला जणू हेच सांगत आहे त्यामुळे आता तरी तंबाखूला नाही म्हणा.
चला तंबाखूचा इतिहास पाहू या ः तंबाखू मूळ भारत नसून ती पोर्तुगीजांनी 16 व्या शतकात प्रथम भारतात आणले आणि ते पीक इतकं फोफावलं की आजच्या परिस्थितीत तंबाखू उत्पादनात भारत जगात तिसर्या क्रमांकावर आहे. तसेच एक नंबरचा तंबाखू निर्यातदारसुध्दा बनला आहे. तंबाखूबाबतचा जागतिक इतिहास पाहिला तर फ्रान्सचा पोर्तुगालमधील राजदूत जॉ निको याने इ.स. 1560 मध्ये एका रूपेश बेल्जियम व्यापार्याकडून तंबाखू विकत घेतली. हा तंबाखू त्याने फ्रान्सच्या राणीला भेट दिली. वनस्पतींच्या ज्या वंशातून तंबाखू उद्भवतो त्याला, याच जाँ निकोच्या स्मरणार्थ निकोटिआना असे नाव दिले गेले.
तसेच तंबाखू, तमाकू आणि टोबॅको या नावांचे मूळ कॅरेबियन बेटांवर आहे असे मानले जाते. कोलंबस बेटांवर उतरल. त्या काळात कॅरेबिन स्थानिक लोक तंबाखू वापरतांना त्यांना आढळले. ते त्या काळी विस्तवावर तंबाखूची पाने टाकून, त्यांचा धूर नळीतून ते नाकाने ओढत. या नळीला ते टांबाको म्हणत त्यावरुनच पूढे तंबाखूची सर्व नावे प्रचलित झाली असावीत असे मानले जाते.
भारतात तंबाखू जगवणारी एक वनस्पती आहे हिची पाने वाळवून, कुस्करुन त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी मोठया प्रमाणावर करताना आढळतात. त्याच चुन्यापासून गुटका बनवितात. वाळलेल्या अखंड पानापासून बिडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. बिडी, सिगरेट, सिगार चिरुट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरडयांना मिशरी, चुन्याबरोबर मिसळून पानात घालून आणि अशा नानाविध स्वरुपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक म्हणून सुध्दा घेतले जाते. भारतीय उपखंडात पिकणारा बहुतांश तंबाखू हा त्यापैकी निकोटिआंना टबॅकम या जातीचा असतो.
निकोटीनचे प्रमाण भारतीय तंबाखू विरोधात पेक्षा जास्त असते. तसेच अल्लक्लॉइड हा रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या रोपटयाच्या मुळांमध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपटयातील जवळपास 64% निकोटीन पानांमध्ये असे आढळून येते. निकोटीज हे कीटकनाशक ही आहे. न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात निकोटीनचे कीटकनाशक गुणधर्म वैज्ञानिकरित्या सिध्द झाले आहेत हे विशेष. याचे दुष्परिणाम निकोटीन वेगाने रक्त प्रवाहात मिसळू शकते. निकोटीन त्वचेतून तर शरीरात चटकन शिरतेच. परंतु धुम्रपानातील धूर / तपकीर यांद्वारे ते श्र्वसनमार्फत सोडले की लागलीच रक्तात मिसळते. रक्तप्रवाहात शिरकाव झाल्यापासून 10-20 सेकंदांत ते संपूर्ण शरीरात पसरते व महत्त्वाचे म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचून नशा चढल्याचा अनुभव देते. निकोटीन आपल्या रक्त प्रवाहात मिसळले की आपल्या मनात शारीरिक व मानसिक स्वास्थाची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते. निकोटिनचा हा परिणाम काही काळाने शुध्द रक्त पुरवठा कमी होतो. हीच भावना परत मिळविण्यासाठी पुन्हा निकोटीनचे सेवन केले जाते व थोडयाच काळात त्याचे व्यसन लागते.
निकोटिन व्यसनी व्यक्तींना अल्झायमर्स स्किझोफ्रेनिया हे मेंदूशी संबंधी रोग होण्याची शक्यता असते. कुठल्याही स्वरुपातील तंबाखू सेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात.फुप्फुसाचा कॅन्सर सिगारेटमुळे होतो. तंबाखुच्या वेगवेगळया जातीनूसार त्यात पाचशे ते सहाशे प्रकारचे विविध रसायने असतात. त्यामुळे तंबाखूची आसक्ती निर्माण होतांना आढळत आहे.
निकोटिन सल्फेट हे तंबाखूच्या गाळातून तयार होणारे कीटकनाशक आहे. म्हणजेच तंबाखूनच अक्षरश: विष तयार होते. तंबाखूच्या पिकाला तोंड लावत नाहीत. थोडक्यात सांगायचे या पृथ्वीतलावर तंबाखू खाणारा मानव हा एकमेव प्राणी आहे. तसेच जगभरात तंबाखू विरोधी आंदोलने होत असतात. परंतु सिगारेट कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे त्याच्या खपावर फारसा परिणाम होतांना दिसत नसला तरी इंडियन टोबॅको कंपनी म्हणजे खढउ ने तंबाखू जन्य उत्पादना ऐवजी शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत ही चांगली बाब आहे . महाराष्ट्र राज्य देशातील पहिल राज्य आहे त्यांनी सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम 2003 हा केंद्राचा कायदा या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे.
तसेच बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास 1 लाख रुपये आणि 7 वर्ष शिक्षेची तरतूद आहे. बालन्याय कायद्यानुसार कारवाई करण्यात येते असा कायदा लागू करण्यात आला. तर मागील वर्षी शासनाने सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकल्यास दंड व शिक्षा असे प्रायोजन केले असले तरी अंमलबजावणीत कमतरता दिसत आहेत. एकीकडे व्यसन करणार्यांचे प्रमाण इतके जास्त आहे की ही बंधने व कायदे ते मानत नाहीत अथवा त्यांना भीती नाही. तर तंबाखूला हळूहळू भिनणारे विष मानतात. कारण त्याचे परिणाम लगेचच दिसून येत नाहीत. तंबाखू खाण्यामुळे संसार विस्कटत नाही. कुटूंबाच नुकसान होत नाही, त्यामुळे तंबाखूच्या व्यसनाकडे गंभीरतेने बघितले जात नाही. तर काहीजण तंबाखू खाण्याचे चक्क फायदे सांगताना सुद्धा सापडतात हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. एकीकडे शरीरातील असा कोणताही अवयव नाही ज्यावर तंबाखुमुळे परिणाम होत नाहीत. माणसाच्या शरीरात रक्तवाहिणींचे जाळ असत. तंबाखूच्या अतिरिक्त सेवनामुळे या रक्तवाहिण्या अंकुचन पावतात आणि कठीण होतात त्यामुळे वेगवेगळे विकार होऊ शकतात.
जगात हृहदयविकार हे तिसर्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण होय आणि हृदयविकाराच्या मुळाशी तंबाखूच आहे. दर पाच सेकंदाला एक माणूस तंबाखूच्या आजाराने मरण पावतो असा अंदाज आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तंबाखूचे अनियंत्रित सेवन रक्तवाहिण्या आंकुचन पावल्यामुळे रक्त पुरवठा अतिरिक्त दाबाने हातो. त्यामुळे हृदयाच्या स्नांयूवर खूप ताण पडतो. हा ताण हृदयाला सहन होत नाही व नंतर कालांतराने हृदयविकाराचा झटका येतो. तसेच बिडी / सिगारेट ओढल्यामुळे कार्बनचे कण फुप्फुसात आढळतात व श्वसननलिकेचा दाह होतो. या दाहामुळे कफ होतो. त्यामुळे दोन प्रकारचे विकार संभवतात. मेंदुत रक्तस्त्राव होऊन अचानक माणूस मृत्यू पडू शकतो. काही जणांना अपुर्या रक्तपुरवठयामुळे विचार करण्याच्या भागाला क्षते पडतात. अशी क्षते पडल्यामुळे भान राहत नाही, व काळ-वेळ यांचा गोंधळ होतो त्या क्षतामुळे स्मरण शक्तीवर परिणाम होतो.
गुटख्याच्या सेवनामुळे आम्लपित्याचा त्रास होतो. या पित्तामुळे हे जळ-जळ होते. अल्सरचा त्रास होतो. तसेच पोटात तंबाखूचे कण चिटकून नसतात ते कुजता व पोटात व्रण निर्माण होतात. विशेष जगात तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. याचे कारण तंबाखू खाणारे सर्वाधिक लोक भारतात आहेत.तर पर्यायाने महाराष्ट्र राज्य यात पुढे आहे. गेल्या अनेक वर्षे वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणाच्या अकडेवाडीनुसार यात वाढ होताना दिसत आहेत यात जिल्हा स्थरिय सर्वेक्षणात राज्यात 50टक्के पेक्षा अधिक नागरिकांमध्ये हे व्यसन आढळून आले आहे. दरवर्षी तब्बल 60 लाख नागरीकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. 2030 पर्यंत मृत्यु चा आकडा 80 लाखापेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असे कोरोना सारखे संसर्गजन्य महामारी आली तर हा आकडा नक्की दुप्पट होऊ शकतो. मोठमोठ्या शहरातील तरुणांमध्ये एक प्रकारचे फॅशन म्हणून तर आजच्या आधुनिक जीवन शैलीमध्ये कामाच्या ताण धूम्रपानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे मनावर ताबा ठेवून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे, हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.
तंबाखू व तंबाखूजण्य पदार्थ सेवनाने दरवर्षी जगात 55 लाख तर भारतात 10 लाख लोक मृत्यृमुखी पडतात. तसेच जगात 100 कोटी लोक तंबाखूचे व्यसन करतात. त्यात भारतात 25 कोटी लोक तंबाखू व्यसनाच्या आहरी गेले आहेत. भारताच्या शहरी भागातील 1% महिला तंबाखु सेवन व धुम्रपान करतात तर ग्रामिण भागातील 2% महिला तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन करतात. त्यामुळे 24.3% पुरुष व 2.9% महिला भारतात तंबाखूजन्य पदार्थ्यांचे व्यसन करतांना आरोग्य मंत्रालय भारत सरकारच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. देशात प्रौढ व्यक्तीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक असुन आता हे लहान व किशोरवयीन मुलांमध्ये मध्ये पोहचतांना दिसत आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन, साठवणुक व विक्री करण्यावर राज्य शासनाने बंदी घातली तरी अंमलबजावणी मात्र होतांना दिसत नाही. त्यामुळे मोठया प्रमाणावर नियमांचे उल्लंघन होत आहे. यात अत्यंत महत्त्वाचे व सकारात्मक कोवळी मने संस्कारक्षम असतात, मोठ्यांचे अवलोकन करुन चांगले, वाईट गुण अंगी कारतात. तेव्हा देशातील सर्व शिक्षकांनी तंबाखूच्या उच्चाटनासाठी मुंबई सलाम फाऊंडेशन यांनी सुरु केलेल्या तंबाखु मुक्त शाळा या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातुन पुढे येणे आवश्यक आहे कारण जर बालवयातच तंबाखूचे दुष्परिणाम बाबत जनजागृती केली तर ते मुले व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत व एक पत्र व्यसनमुक्तीसाठी शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमात हजारो कुटुंबातील तंबाखू सेवन करणारे नागरिक यात महिला सुद्धा मुलांमुळे व्यसन मुक्त ठरले आहे. त्यामुळे हा उपक्रम एक चळवळ म्हणून पुढे नेणे प्रत्येकाचे जणू कर्तव्यच आहे. तर आजचा जागतिक तंबाखू विरोधी दिन आपल्या सर्वांना जणू संदेश देत आहे तंबाखू खाणे व धुम्रपान करणे सोडा, निरोगी व आनंददायी जीवन जगा. भारत सरकारने सुध्दा या सर्व उत्पादनांवर कायमची बंदी करुन महसुलासाठी पर्यायी व्यवस्था निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले पाहिजे, नाहीतर हे व्यसन आपल्याला सोडणार नाही. शेवटी तंबाखू मुक्तीसाठी पुढे आले पाहिजे!
- रवी ढगे, जिल्हा समनव्यक,
तंबाखू मुक्त शाळा अभियान, जिल्हा परिषद नांदेड
मो.नं.9421646573



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .