नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
किनवट तालुक्यातिल कमठाला केंद्रातील जिल्हा परिषद लोणी शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली. झाडे लावू, झाडे जगवू, पर्यावरण वाचवू म्हणत विद्यार्थ्यांनी ऑक्सिजन पेरण्याचा संकल्प केला. प्रत्येकाने ' एक झाड आईचे ' नावाने लावत शासनाच्या उपक्रमात कृतिशील सहभाग घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी वृक्षदिंडी निमित्त पर्यावरण वाचविण्यासाठी प्रत्येकाने नुसते झाडे लावून चालणार नाही तर त्याला जगवलं पाहिजे कारण झाडेच आपल्याला ऑक्सिजन देतात, फळ -फुले देतात, वनऔषधी मुळे अनेक आजारावर उपचार होतो. वृक्ष विविध उपयोगी आहेत. म्हणून शालेय वयातच विद्यार्थ्यावर संस्कार झाले पाहिजे असेही ते म्हणाले.
विठ्ठल नामाची शाळा भरली.. म्हणत गावातील प्रमुख मार्गाने वृक्षदिंडी उत्साहात निघाली. वारकरी व विठ्ठल रुक्माई च्या वेशभूषेत विद्यार्थी भारतीय संस्कृती परंपरा जपत पुढे चालले होते. तेव्हा गावातील महिला पुरुषाने मोठ्या संख्येने सहभाग घेत फुघड्या -रिंगण करत विद्यार्थ्यासोबत चालत होते. शेवटी शाळेच्या मैदानात कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर, गजानन लोंढे, अनंता बादड, उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार, पदवीधर शिक्षक अंकुश राऊत, तंत्रस्नेही शिक्षक राहूल तामगाडगे, एकनाथ बादड, अंगणवाडी सेविका शोभा गेडाम, नंदाताई सावरकर, सत्वशीला मोहिते, नेहा पावडे, जयश्री बादड यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत सहभाग घेतला.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .