"अपणेही कर्मोका फल है नेकी और रुसवाईया|
आप ही के साथ चलेगी आपकी परछाईया " I
आपल्या देशात आनेक जाती धर्माचे ,पंथाचे लोक राहतात.आपआपल्या रितिरिवाजाप्रमाणे धार्मिक सण साजरी करण्याची परंपरा आहे..या सणा तून राष्ट्रीय एकात्मता तथा आनंद वा एकमेकांना शुभेच्छा देऊन एकतेच्या सुञात बांधण्याचे कार्य हे आपले सण -उत्सव करत असतात..त्याच प्रमाणे मुस्लीम बांधवांचा पवित्र सण म्हणजे रमजान होय..
रमजान या शब्दाचा अर्थ रम्ज म्हणजे गरम, गर्मीच्या दिवसात ईस्लामीक नववा महिना म्हणजे रमजान. एकुन बारा महिने1)मुहर्रम2)सफर3)रबीउल अव्वल 4)रबीउल आखिर 5)जमादा उल आखिर 6)जुमादा अल आखिर 7) रज्जब 8)शाबान 9)रमजान 10)शव्वाल 11)जिलकद 12)जिल हद असे बारा महिने. मुस्लिम बांधवासाठी पाच स्तंभ दिले आहेत ते फर्ज म्हणजे आवश्यक आहेत.1) शहादा. शहादा म्हणजे अल्लाह एक आहे, मुहम्मद अल्लाह के रसुल आहेत 2)नमाज .सर्व मुस्लीम बांधवासाठी पाच वेळेची नमाज आवश्यक आहे.3)रोजा .सर्व मुस्लीम बांधवासाठी रोजा (उपवास) आवश्यक आहे.4)जकात . जकात म्हणजे आपल्या संपत्तीचा काही हिस्सा दान करणे.5)हज . हज म्हणजे मक्का मदिना येथे एक वेळेस तिर्थ याञा करणे..
रमजान ईदला ईद-ऊल-फिञ असे म्हटले जाते.रमजान हा मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र महिना समजला जातो.या महिन्याच्या सुरवातीलाच जन्न्त म्हणजे स्वर्ग .या महिन्यात स्वर्गाची दारे उघडली जातात .आणि जहन्नम म्हणजे नर्क. आणि नरकाची दारे बंद केली जातात.या महिन्यात गरिबापासुन ते श्रीमंतापर्यत सर्वच बांधव पुण्याची कामे करतात.दान धर्म ,कुराण पठण करतात.संध्याकाळी तरावीह म्हणजे तीस दिवसात दररोज एक पारा पढतात(तीस पारे एक कुरआन)अशी नमाज अदा करतात.सर्व स्ञी -पुरुषांना रोजा (उपवास)फर्ज म्हणजे अनिवार्य असते..
रमजान ईदची वैशिष्ट्ये म्हणजे या महिन्यात केलेले पुण्य,दान धर्म आणि अल्लाहसाठी खर्च केलेल्या एका रुपयाच्या बदलत्यात अल्लाह सत्तर पटीने पुण्य देतो अशी श्रध्दा मनात असते. या महिन्यात जास्तीत जास्त दान धर्म आपल्या मिळकतीतून 10टक्के कमाई गोर -गोरीबात वाटणे,कपडे वाटणे ,अन्न दान करणे,घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे फितरा (जकात) देणे,फितरा म्हणजे अडिच शेर धान्य किंवा रोख रक्कम दिली जाते.आपल्याकडे असलेल्या सोने चांदी यावरुन ही फितरा काढला जातो.हा फितरा गरिबापासुन श्रीमंतापर्यत आपल्या कुवती प्रमाणे फितरा वाटण्यात येतो. त्याचप्रमाणे आयुष्यभरात कळत नकळत आपल्या हातुन झालेल्या चुकां माफ केल्या जातात.पण त्या चुका पुन्हा करणार नाही असे अल्लाह जवळ कबुली द्यावी लागते.याच महिन्यात जे जे रोजेवाले म्हणजे ज्यांचा उपवास आहे अशा लोकांनसाठी सधन लोक ईफ्तार पार्टीचे आयोजन करतात.या मध्ये सुद्धा गरीब श्रीमंत असा भेदभाव न राहता एकञ सहभागी होतात ...
मुस्लिम बांधवासाठी 'हज' हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.आयुष्यात एकदा तरी हज करावा असे सांगितले आहे. आपल्या कुवती प्रमाणे.परंतु कुणाकडुनही उदार पादार अथवा कर्ज काढुन हज ला जाणे मान्य नाही..ईस्लाम धर्माने समता,एकता ,मानवता आणि शांतीचा संदेश दिल्यामुळे मुस्लीम बांधव अशी समता जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वर्षभरात आपल्या नातलगाशी किंवा शेजा-या पाजा-याशी भांडणे झाली असतील तर रमजान महिन्यात त्याचे रुपांतर मैत्रीत होते,प्रेमात होते.एकमेकांचे शञुत्व विसरुन मैञीत रुपांतर होणारा व शांतीचा संदेश देणारा हा रमजान सण आहे..रमजान महिन्यात रोजा (उपवास)ठेवल्याने मनावर ताबा ,संयम ,सहनशीलता,आत्मसंतुलन तयार होते ,खोटे न बोलने ,निंदा न करणे,भांडण तंटे,चोरी न करणे या बाबी पासून दुर राहतो. या महिन्यात मुस्लिम बांधव ईमानदार,सत्यवचन.सत्यवान,आस्तीक,परोपकारी बणतो. साधारण पंधराव्या सोळाव्या रोजापासुन बाजारात गर्दी सुरु होते.घरा घरात नवनविन कपडे खरेदी करण्यासाठी सुरुवात होते.
परंतु आज आपल्या देशात /राज्यात कोरोना विषाणू चा फैलाव झाल्यामुळे सर्व बांधवांनी नमाज घरीच पडण्याचा निर्णय घेतला आहे.व बाजारात खरेदी करण्यासाठी ही न पडण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताविस व्या रोजापासून मोठे रोजे सुरु होतात.अखेरच्या दिवशी सर्व मुस्लीम बांधवांचे डोळे सुर्यास्तानंतर आकाशात चंद्रदर्शन शोधण्यासाठी आतुर होतात.चंद् दिसताच चाँद नजर आया ,कल ईद मनाई जायेगी असे मौलवी सांगतात.ईदच्या दिवशी 10ते 10:30च्या दरम्यान ईदगाह वर सामुदायिक नमाज अदा केली जाते.नमाज संपल्यावर ईद मुबारक हो अश्या शुभेच्छा देतात.लहान मुलांना ईद च्या दिवशी ईदी म्हणून मोठी मंडळी लहान मुलांना पाच दहा रुपये देतात.घरी आल्यावर अनेक पदार्थ घालुन तयार केलेले..जसे दुधात तुप.काजु,बदाम.खारीक,खोबर ,किसमिस,विलायची,आक्रोड,चारोळी,टरबूज बी..शेवया,भरपूर सुका मेवा घालुन तयार केलेला शीरखुरमा खाऊन तोंड गोड करतात. यात सर्वधर्मीय बांधव शीरखुरमा खाऊन शुभेच्छा देतात. असेच म्हणावेसे वाटते ...
"काश हर दिन होती "ईद"और दिवाली..
हर तरफ छाई होती खुशहाली.!
रमजान महिण्यापुरतेच धर्माचे पालन करता आयुष्यभरच आपल्या धर्माचे पालन व दुसऱ्या धर्माचा आदर करणे योग्य राहिल.परंतु काही धर्मांध लोकामुळे मुस्लिम समाजावार वाईट नजरेने पाहण्याची वेळ येत आहे. आपले जे ईद्रिये आहैत त्यांचा वापर विधायक कामासाठी ,देशहितासाठी लावावा..आम्ही भारतीय आहोत ,देश आम्हासाठी प्रीय आहे.अशी भावना ठेऊनच आपण वागायला हवे. आपले आई-वडिल हेच आपले देव आहेत त्यांच्या सेवेत आपल्याला ईश्वर /अल्ल्लाह दिसतो. मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे ..अश्या समाजासाठी अथवा मुलां मुलींसाठी श्रीमंत अथवा दानशुरवृत्तीच्या लोकांनी मदतीचा हात पुढे करुन त्यांची मदत केली पाहिजे . समाजातील सेवानिवृत शिक्षणतज्ञांनी आपला थोडा वेळ काढुन वासंतीक वर्गाचे आयोजन करावे..आयुष्यात हजला एकबार जाणे योग्य आहे..
परंतु पुन्हा पुन्हा जाण्यापेक्षा तोच खर्च गरीब मुलीच्या शिक्षणासाठी अथवा लग्नासाठी वापरला तर निश्चितच योग्य राहिल. आजही मस्जीदमधील ईमाम अथवा मौलवींचा पगार खुपच कमी आहे.. पाच सहा हजारात त्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल त्यासाठीही दानशुरांनी पुढाकार घेऊन मानधनात वाढ करता येते का ते पाहणे आवश्यक आहे,. सद्याचा काळ हा कोरोना विषाणू महामरीचा असल्यामुळे आपल्याला काही बंधने पाळुन शासनाचे नियम पाळुनच रमजान ईद घरीच साजरी करावयाची आहे...कोविड योध्दे यांना साहस व बळ मिळो व कोरोनाचा नायनाट होवो हीच प्रार्थना करु ..हा विषाणू समुळ नष्ट झाल्यानंतर .सामुदायिक विवाहसोहळ्यांचे आयोजन करायला हवे,,गोरगरिबांच्या व तसेच होतकरु मुलांनसाठी अभ्यासिकेचे वर्ग सुरु करण्यावर भर द्यायला हवे.. शैक्षणिक महोत्सवाचे आयोजन,चर्चा सञे सुरु करायला हवे.धार्मिक तीथीवर जास्त खर्च न करता तसेच मस्जीद ,मंदिर.गुरुद्वारै प्रमाणे आरोग्य यंञनेवर भर दिला जावा.
आज प्रत्येक गल्लीत मंदिर,मस्जीद वा प्रार्थना स्थळे आहेत..फक्त दवाखाने नाहीत.. मोठ मोठे..कुंभमेळे ,जलसे. धार्मिक मेळावे , नेत्यांचे पुतळे उभारण्यापेक्षा/ भरवण्यापेक्षा त्या एवजी मोठ मोठे दवाखाने उभारण्यावर भर दिला जावा..जेणे करुन भविष्यात आरोग्य विषयक समस्याच निर्माण होणार नाहीत.. त्याचप्रमाणे गावातील प्राथमिक शाळेला लोकसहभाग देऊन सहकार्य केले तरच ख-या अर्थाने रमजान ईद साजरा केल्याचे सार्थक होईल....
-प्रा.युसूफ शेख आंबुलगेकर
नवरंगपूरा /कंधार
9860938174



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .