अमरावती( प्रा.दिपक अंबरते ) :
अशोक शिक्षण संस्था अशोकनगर द्वारा संचालित कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिगी द्वारा आयोजित पंधरा दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास व स्पर्धापरीक्षा आॕनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा चे पहिले पुष्प प्रा.डाॕ प्रतिभा काळमेघ शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव जि यवतमाळ यांनी गुंफले.विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद या व्याख्यानाला आॕनलाईन लाभला.
आपल्या वेबिनार मधून डाॕ काळमेघ म्हणाल्या , विद्यार्थाना आपल मत ठाम मांडता आल पाहीजे.मनातील भय दुर करा. यायुष्यात मानस जोडता आली पाहीजे.संवादसाधून ,चांगल्या उपक्रमाअंतर्गत मानस जुळतात.त्यामुळे ज्ञानात,विचारात भर पडते. वाचन केले पाहीजे . दररोज वर्तमानपत्राचे वाचन करा. ज्ञानकक्षा रुंदावतात, जिवणमुल्ये, नितिमुल्ये रुजल्या जातात. चांगला श्रोता आधी बना.जगण्यामध्ये आनंद शोधा.मानवी आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही.विनोदबुध्दी निर्मान करा,हसतखेळत रहा.अस जिवन सर्वाना आळडत.संकट सर्वांच्या आयुष्यात येतात.इतरांचा आदर करा आपली वेशभूषा कशी असावी ते कळल पाहीजे. प्रसंगानूसार पोशाख करता आला पाहीजे.आपल आत्मपरीक्षण स्वतः नेहमी करता आल पाहीजे.आत्मविश्वास निर्मान करा.व्यक्तित्वामध्ये विविध पैलू ओतले तर परीपुर्ण व्यक्तिमत्त्व तयार होईल.
शरीराची सुंदरता संपते पण सुंदर व्यक्तिमत्वास लोक चिरंतन आठवणीत ठेवतात.म्हणून मनात चांगले विचार पेरा.उंच उडान भरण्याचा मानस ठरवा.उडायच फक्त तुम्ही मनात आणा,दिशांची तुम्हांला वान नाही,तुम्हांला अडवू शकेल ,असे कोणतेही तूफान नाही.. असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यशाळा मध्ये कान्होजीबाबा क.म.वी अंजनशिंगी , अशोक महाविद्यालय चांदूररेल्वे , कुर्हा ज्युनिअर काॕलेज कुर्हा या तिन काॕलेज मधिल विद्यार्थांचा आॕनलाईन मोठ्या संखेने सहभाग आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .