पर्यावरण दिनानिमित्त राज्यस्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेचे आयोजन..

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक भारती महिला संघटनेचा उपक्रम


नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी मालेगाव च्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त राज्यस्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


निबंध स्पर्धेचा विषय.. १)कोरोनाची शिकवण..वाचवा पर्यावरण  २)वृक्षवल्ली आम्हां सोयरे" ३)ऑक्सिजनसाठी  वृक्ष संवर्धन .. असे ठेवण्यात आले आहेत.

 


या स्पर्धेसाठी काही नियम व अटी आहेत..

१)निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला अथवा word file फॉरमॅट मध्ये असावा.

२) निबंध १०००-१२००शब्दात असावा. 

३) लिहिलेल्या निबंधाची PDF फाईल बनवून पाठवावी. फाईलवर स्वतःचे नाव लिहावे.

४) स्वतंत्र पानावर आपले नाव ,शाळेचा पत्ता पूर्ण लिहावा. Whatsapp नंबर व ईमेल लिहावा.

५)स्पर्धा निःशुल्क असून सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन 'सहभाग प्रमाणपत्र' देण्यात येईल. 

६)पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येतील. 

७) अंतिम निर्णय संयोजकांकडे राहील.


पुरस्काराचे स्वरूप..

प्रथम पुरस्कार - रोख १५०१ रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,

द्वितीय पुरस्कार - रोख १००१रूपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,

तृतीय पुरस्कार  - रोख ५०१रुपये,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.

उत्तेजनार्थ (दोन)- रोख २५१ रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.


निबंध पाठवण्याची अंतिम तारीख - २८मे २०२१

निबंधाची PDF फाईल व व्हाट्सअप नंबर वर किंवा ईमेल वर पाठवावे.

स्पर्धेचा निकाल ५जून २०२१ रोजी जाहीर केला जाईल.

या संदर्भात संपर्क करू शकता..

१)श्रीम नूतन चौधरी-  86054 39846  

२)श्रीम विजया भदाणे- 86052 68788 

३)श्रीम. सारिका आहिरे- 8806534735 

४)श्रीम छाया देसले- 8698164251 

५)श्रीम मनिषा सावळे.- 9403180880

ईमेल: shikshkbhartimahilamlg@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)