किनवटच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण !
नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :
शासनाच्या वृक्ष लागवडीच्या धोरणानुसार किनवट येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, शिक्षणविस्तार अधिकारी संजय कराड, अशोक हमदे, मेश्राम, पत्रकार गोकुळ भवरे, उत्तम कानिंदे , मुख्याध्यापक शिवाजी काकरे , गजानन निळकंठवार, वसंत राठोड, वरिष्ठ सहाय्यक गिरीधर नैताम, विषय साधन व्यक्ती संजय कांबळे, बोलेनवार, आशा येडे विशेषज्ञ बाबू इबितदार, कुंतलवार, फिरते शिक्षक दत्ता मुंडे, गीते, उषा राठोड, बाळू कवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याच प्रांगणात अटल घनवन मियावाकी प्रकल्पांतर्गत वृक्ष लावून त्यांचे जतन करून येथे नैसर्गिक ऑक्सिजन प्रसारित करण्याचा मानस आहे. कार्यालयातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक एक झाड दत्तक घेऊन त्यांची जोपासना केली तरच डौलाने फुलणारी हिरवाई पाखराच्या किलबिलाटसह दृष्टीस पडेल असे गटशिक्षण अधिकारी अनिल महामुने म्हणाले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .