3 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होतील. .
20 ऑक्टोबर चे पत्र निर्गमित !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ पासून ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. विविध शिक्षक संघटना/शिक्षकेत्तर संघटपस/मुख्याध्यापक संघटना यांनी दिपावली सुट्टीचा कालावधी वाढून मिळणेबाबत विनंती केली आहे. त्यानुसार दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ पासून दिनांक १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची सन २०२५ दिवाळी सुट्टी बाबत खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
१. नांदेड जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ पासून दिनांक १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
२. प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर सोडून इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दीर्घ सुट्टया अनुदेय नाहीत. मात्र दीर्घ सुट्टयांच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्टया असतील त्या शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागू राहतील.
३. दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ पासून दिनांक १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात येत असून दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी रविवार असल्यामुळे दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ पासून शाळा/कनिष्ठ महाविद्यालय नियमितपणे सुरू होतील.
(मा.मु.का.अ. जिल्हा परिषद, नांदेड यांच्या टिप्पणी मान्यतेने)
शिक्षणाधिकारी (प्रा) जिल्हा परिषद, नांदेड
शिक्षणाधिकारी (मां) जिल्हा परिषद, नांदेड
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .