उदगीर : ( शालेय वृत्तसेवा ) :
येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांची इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार - 2020 - 2021 साठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तसेच आर्यवैश्य ऑफिशिअल व प्रोफेशनल असोसिएशन ( अव्होपा ) समूहाच्या माध्यमातून केलेले संघटन यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याच्या या पुरस्कार नामांकनाबद्दल म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी अभिनंदन केले आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .