नांदेड ( शालेय वृतसेवा ) :
-महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना शिक्षकांच्या प्रलंबित बदल्यांचा प्रश्न सोडविणे बाबत नुकतेच निवेदन देण्यात आले .यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती .
शिक्षकांच्या मागील दोन वर्षापासून आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्या ऑनलाईन पध्दतीने रखडल्या आहेत, त्या बदल्या यावर्षी जून 2021 अखेर घेण्यात यावे. पेसा व नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्राला अवघड क्षेत्र सरसकट (किनवट व माहूर तालुक्याला) घोषित करुन जून्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना न्याय मिळावा. ज्या ऑनलाईन बदल्या आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना सुरु केल्या त्या बदल्या राज्यातील सर्व शिक्षकांना दिलासा व आनंददायी ठरल्या. त्याच धर्तीवर यावर्षी ऑनलाईन बदल्या करण्यासाठी आपण विशेष लक्ष देऊन पाठपुरावा करावा .
यावेळी देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते विधानसभा यांच्याशी राज्य उपाध्यक्ष जी एस मंगनाळे यांनी सविस्तर चर्चा केली. निवेदनावर राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे , जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे यांच्या स्वाक्षरी आहेत. अशी माहिती किनवट तालुकाध्यक्ष राजकुमार बाविस्कर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा माहुर तालुकाध्यक्ष एस.एस. पाटील यांनी दिली आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .