शिष्यवृत्ती परीक्षा 4थी, 7वी सन 2025-26 च्या पूर्व तयारीबाबत...
शासन परिपत्रक :
मागील वर्षीप्रमाणे शाळा व विद्यार्थी माहिती फॉर्म भरुन ठेवावा.
इ.4थी व इ.7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम, अधिसूचना व इतर अनुषंगिक माहिती लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे.
उपरोक्त विषय व संदर्भीय शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर 5 वी ऐवजी इ. 4 थी व इ. 8 वी ऐवजी इ. 7 वी असा करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार सन 2025-26 या शैक्षणिक सत्रामध्ये इ. 4 थी, इ. 5 वी, इ. 7 वी व इ. 8 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली असून इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम, अधिसूचना व इतर अनुषंगिक माहिती यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्याअनुषंगाने इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व शाळांनी पूर्वतयारी म्हणून शाळा माहिती प्रपत्रामध्ये शाळेची व विद्यार्थी आवेदनपत्रामध्ये (इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेनुसार) परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरुन संकलित करण्यास आपल्या स्तरावरुन कळवावे.
सदर माहिती भरलेली प्रपत्रे शाळेतच ठेवावी, जेणेकरुन सदर परीक्षेची अधिसूचना प्रसिध्द होऊन ऑनलाईन लिंक होताच आवेदनपत्रे ऑनलाईन भरणे सुलभ, जलद व बिनचुक होईल. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना उपरोक्तनुसार कार्यवाही करण्यास सूचित करावे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .