तुम्हीच शिका हवामान नकाशा वाचन
Learn to read weather satellite images maps
सध्या अवकाळी पाऊस हाच सामान्य weather pattern झाला आहे,
त्यामुळे expert लोकांचे सुद्धा हवामान अंदाज अनेकदा चुकू लागले आहेत.
अशा वेळी आपण नागरिक म्हणून आणि खास करून शेती करणाऱ्या लोकांनी कमीत कमी मूलभूत अशी हवामान माहिती ठेवणे आवश्यक आहे.
त्या साठी तुम्हाला वैज्ञानिक बनण्याची सुद्धा गरज नाही.
केवळ IMD India Meteorological Department: IMD Mausam च्या वेबसाईट वर जा.
तिथे अनेक विविध हवामान नकाशे उपलब्ध आहेत त्यातील Water Vapor Count किंवा Water Vapor Channel हा एक जरी हवामान नकाशा बघितला तरी तुम्हाला थोडाफार अंदाज येण्या इतकी हवामान माहिती आणि alert समजू शकेल.
फोटो मध्ये भारताचा नकाशा weather सॅटेलाईट ने काढलेल्या फोटो वर आउटलाईन द्वारे दाखवला आहे.
हा फोटो त्यांच्या वेबसाईट वर दर काही तासांनी अपडेट होत राहतो.
या फोटोच्या वेबसाईट ची लिंक -
@followers IMD Map link - Update every few hours
https://mausam.imd.gov.in/Satellite/3Dasiasec_wv.jpg
या फोटो मध्ये सध्या दोन मोठे कापसाप्रमाणे दिसणारे ढगांचे पुंजके दिसत आहेत. ही दोन्ही चक्रीवादळे स्थिती आहेत.
त्या पैकी लाल वर्तुळात दाखवलेले Cyclone Montha असून ते बंगाल च्या उपसागरात बनले आणि पूर्व किनार पट्टीवर आले आहे.
निळ्या वर्तुळात सुद्धा वादळी स्थिती अरबी समुद्रात बनलेली दिसत आहे परंतु त्याला चक्रीवादळाचा आकार आणि वेग अजून प्राप्त न झाल्याने त्याचे official नामकरण केले गेले नाही.
सांगायचा मुद्दा असा, की ही वादळे अनेक दिवस पासून समुद्रावर बनत आहेत आणि आज पहाटे जमिनीवर आली.
जुन्या फोटो मध्ये वादळे बनताना स्पष्ट दिसतात त्या वरून शेतकरी आणि पाऊसामुळे नुकसान संभवते अशा उद्योगांनी आधीच उपाय करणे आवश्यक आहे.
फोटो मधून शिकण्याचे सामान्य मुद्दे असे -
1] गडद काळा भाग - ढग नसलेले, निरभ्र आकाश
2] हलका करडा भाग - हलका पाऊस, मध्यम ढगाळ आकाश
3] हलका पांढरा भाग - पावसाळी ढग, धुरके
4] दाट पांढरा भाग - वादळी पाऊस
हा नकाशा सर्वात प्राथमिक माहित basic information देणारा आहे त्यामुळे तुम्ही अपडेट झालेले फोटो वेबसाईट वर जाऊन सहज बघू शकता.
ह्याचाच दुसरा ऍडव्हान्स मॅप advance color coded weather maps सुद्धा आहे त्याची लिंक सुद्धा कमेंट मध्ये बघा.
सध्या तरी काही दिवस ही वादळे राहतील आणि विविध भागात कमी जास्त तीव्रतेचा पाऊस पडतील, पुढील महिन्याच्या सुरुवातीला हाच मॅप लिंक IMD Website वर जाऊन बघून तुम्ही वादळे संपल्या वर दिसणारी sky weather condition स्थिती बघू शकता.
माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.
( सौजन्य : आकाशातील गमती जमती fb )


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .