शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी विविध स्पर्धा..Various competitions for teachers, staff and officers

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी विविध स्पर्धा..


         सर्व शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांना कळविण्यात येते की, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत माहे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी तालुकास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तर अशा विविध स्तरावर एकूण 43  स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या शिक्षकांना या  स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली माहिती केंद्रप्रमुखांना द्यावी व आपण कोणत्या  स्पर्धेसाठी इच्छुक आहात ते कळवावे.  म्हणजे केंद्रप्रमुखांना आपली माहिती राज्यावरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक मध्ये भरता येईल. 


43 स्पर्धा खालीलप्रमाणे आहेत :


1 क्रीडास्पर्धा

2 शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा

3 हॅकेथोन स्पर्धा

4 शाळांमधील विविध क्लब सादरीकरण स्पर्धा

5 विज्ञान व गणिताचा जादुगार

6 बालमानसशास्त्र - केसस्टडी स्पर्धा

7 व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धा

8 व्यक्ती अभ्यास स्पर्धा

9 MS Word व MS Excel स्पर्धा

10 MS PPT स्पर्धा

11 Animation सादरीकरण स्पर्धा

12 स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धा

13 लोकनृत्य

14 रांगोळी स्पर्धा

15 वक्तृत्व स्पर्धा

16 संगीत वाद्य वादन स्पर्धा

17 कथाकथन स्पर्धा

18 वादविवाद स्पर्धा

19 नाट्य / नाटक, भूमिका अभिनय व मूक अभिनय स्पर्धा

20 योगासन स्पर्धा

21 सुगम गायन स्पर्धा

22 फोटोग्राफी स्पर्धा

23 पुस्तक परीक्षण स्पर्धा

24 पोस्टर्स बनवणे

25 प्रवास वर्णन लेखन स्पर्धा

26 कथालेखन स्पर्धा

27 शोधनिबंध स्पर्धा

28 शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा

29 डॉक्यूमेंटरी स्पर्धा

30 आत्मचरित्र लेखन स्पर्धा

31 मानसिक क्षमता व माहिती विश्लेषण स्पर्धा

32 आशयज्ञान स्पर्धा

33 सुलेखन स्पर्धा

34 सुडोकू शब्दकोडे व प्रश्नमंजुषा स्पर्धा

35 समजपूर्वक वाचन स्पर्धा

36 परकीय भाषा स्पर्धा

37 बोर्ड स्पर्धा परीक्षा

38 मराठी ऑलिंपियाड स्पर्धा

39 गणित ऑलिंपियाड स्पर्धा

40 इंग्रजी ऑलिंपियाड स्पर्धा

41 विज्ञान ऑलिंपियाड स्पर्धा

42 सामाजिक शास्त्र ऑलिंपियाड स्पर्धा

43 बुद्धिमत्ता चाचणी ऑलिंपियाड स्पर्धा


             वरील 43  प्रकारापैकी आपण इच्छुक असलेल्या कोणत्याही एका  प्रकारासाठी आपली नाव नोंदणी केंद्रप्रमुख यांच्याकडे दिनांक 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी करावी.  केवळ केंद्रप्रमुखांकडे नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांनाच सहभाग घेता येईल याची नोंद घ्यावी. 


टीप : स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावरून आलेल्या पत्रांचा अभ्यास करावा.


आदेशानुसार 

प्राचार्य, डायट नांदेड 


 शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक) 

( जिल्हा परिषद, नांदेड )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)