शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रम व विविध तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी - गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के

शालेयवृत्त सेवा
0

                     



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जि.प .प्रा.शा.उमरातांडा ता.लोहा येथील मु.अ.अशोक कपाळे हे   नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त सुगाव संकुलातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांच्या वतीने जि.प.प्रा.शा.भिमलातांडा येथे त्यांच्या निरोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे  शिक्षण विस्तार अधिकारी के.के.फटाले ,केंद्रप्रमुख टी. पी. पाटील  , जि.एस मंगनाळे राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटना,केंद्रीय मुख्याध्यापक बी.जी. कापसे , मुख्याध्यापक आर.डी.वाकोरे , मुख्याध्यापक आय.बी.सय्यद  आदीची प्रमुख उपस्थिती होती.  


यावेळी बोलतांना गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के आपले  विचार मांडताना म्हणाले की, शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रम व विविध तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी .शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आपली फक्त शासकीय सेवा संपलेली असते. आपण सेवेतून निवृत्त होतो. पण आपल्यातील शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो. त्यामुळे निवृती नंतरसुद्धा  शिक्षकांनी आपले समाज बांधणीचे काम सोडू नये. आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला करुन द्यावा. यानंतर सर्व प्रमुख पाहुणे व उपस्थित शिक्षकांच्या वतीने सत्कारमूर्ती अशोक कपाळे  यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी कार्यक्रमासाठी  एम.डी.सिरसाट,  व्ही.व्हि.नाईक , व्ही.व्हि.आमनवाड ,बी.आर. वाघमारे,बी.ए.ढाले , एम.बी.शेख , सी.जे.सैदमवार , बी.एच.पाटील ,  के.यु.राठोड, आर.जी.तलवारे,राहुल कुंडलवाडीकर , एम.व्ही.शितळे , बी.बी.शिंदे ,  व्ही.आर.लामदाडे , एम.जी.मेथे , संगिता पाटील , संभाजी आलेवाड  ,  बालाजी कवटीकवार   , आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन गणपत चव्हाण  यांनी केले. आभार प्रदर्शन  आर.डी.वाकोरे मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)