नाशिक (शालेय वृत्तसेवा):
आत्ता पर्यंत वरिष्ट व निवड श्रेणीचे ६२८ प्रस्ताव कार्यालयाकडे प्राप्त झाले असून ५२२ प्रस्ताव मंजुर केले आहे व प्रशिक्षणा अभावी १०६ प्रस्ताव प्रलंबित आहे मात्र सदर शिक्षकांकडून हमीपत्र घेऊन तेही प्रस्ताव मंजुर करण्यात येतील यासाठी वरिष्ट पातळीवर पत्रव्यवहार केला आहे . लवकरच त्यावर तोडगा निघेल असे डॉ. वैशाली झनकर म्हणाल्या .
नुकतीच नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षणविभाग यांची संयुक्त सहविचार सभा क्रां . व्ही . एन . नाईक शिक्षण प्रसारक संस्थेत मा . शिक्षणाधिकारी श्रीमती डॉ.वैशाली झनकर - वीर मॅडम, यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . या वेळी माध्यमिकचे ओ एस सुधीर पगार साहेब ,उपशिक्षणाधिकारी श्री व्ही . आर . बागुल , अधिक्षक वेतन पथक श्री उदय देवरे साहेब, श्रीम पी . यु . पिंगळकर ओ . एस . श्री बोटे साहेब, सिताराम हगवणे ,भोई शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते . मुख्याध्यापक संघातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव -श्री एस बी देशमुख यांनी केले . विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली .
विषय १ ) मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक पदोन्नतीस मान्यता देण्यात आलेल्या आहेत पैकी ज्या ठिकाणी सेवाजेष्टता व संस्था वादातील प्रकरणे प्रलंबित आहे . मुख्याध्यापक संघाने 22/3 / 2021 रोजी दप्तर दिरंगाइचे पत्र दिले त्याचे उत्तर अद्याप मिळाले नाही असा संतप्त सवाल एस . बी . शिरसाठ यांनी मांडला त्यावर वादळी चर्चा होऊन या पुढे दप्तर दिरंगाई होणार नाही असे शिक्षण विभागा कडून सांगण्यात आले.
विषय २) वरिष्ट श्रेणी व निवड श्रेणीचे प्रलंबित सर्वच प्रस्ताव १५ दिवसात मार्गी लावले जातील असे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले .
विषय 3)शै . वर्ष 2021 - 22 मधील सुट्यांची यादी निर्गमित करण्यात आलेली आहे ४)वर्षातील 78 सुट्ट्या व कामाचे दिवस कमीत कमी २२० प्रमाणित करण्यात आलेले आहे . राष्ट्रीय सण, पुण्यतिथी इ . कार्यक्रमाचे दिवस कामकाजात यावे यासाठी संघ आग्रही होता .
विषय ५ )चालू शैक्षणिक वर्षातील online व offline शिक्षणाविषयी मा . शिक्षणाधिकारी मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . १५ जून पहिल्याच दिवशी ८६० शाळा online सुरु होत्या त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षण विभागाचा आदेश असेपर्यत online अभ्यासक्रम चालू राहील . यावेळी विविध उपक्रमांची माहिती दिली .शासन आदेश आल्यानंतर offline अध्यापन शाळा सुरु होईल असे सांगितले.
यानंतर सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शाळा तपासणी, संचमान्यता, युडायस ,नावात बदल प्रस्ताव अँपची माहिती ,एस . एस . सी .परीक्षा गुणदान ,दाखला व त्यावरील द्यावयाचा शेरा . online व offline पगारबीले, मेडीकल बीले, सेवानिवृतीची प्रकरणे, परतावा व ना परतावा बिले, फरक बीले याबाबत मा . देवरे साहेब यांनी सखोल माहिती दिली . एप्रिल पर्यंतची नियमित बीले मंजूर करण्यात आलेली आहे मे ची बीले ट्रेझरी मध्ये टाकलेली आहे . जून ची सुचना दोन तीन दिवसात मिळेल व सदर बीले १५ जुलै पर्यंत मंजूर होतील असे आश्वासन मा . श्री उदय देवरे साहेब यांनी दिले .
वादांकित संस्था चालक, मुख्याध्यापक यांच्या सुनावणी होऊन मागील महिण्यात अनेक प्रश्न मार्गी लावले . काही संस्थावर कायदेशीर कारवाई व प्रशासक नेमण्याची शिफारस केलेली आहे . शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून काम करून घेतले जाईल . प्रत्येक घटकाचा प्रश्न मार्गी लावला जाईल त्याबाबत मा . शिक्षणाधिकारी श्रीम. डॉ. वैशाली झनकर ( वीर ) यांनी मनोगतातून सांगितले . शिक्षकेत्तर कर्मचारी १२ वर्ष कालबद्ध पदोन्नती आश्वासीत प्रगती योजनेचे लाभ कर्मचाऱ्यांना लाभ देणे तसेच सन २०१८ / १९ च्या संच मान्यतेनुसार मंजुर पदाचे प्रस्तावास त्वरीत मान्यता देण्याचा आग्रह संघाने धरला . या वेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री एस. के . सावंत , कार्याध्यक्ष श्री . एस .बी . शिरसाठ , सचिव श्री . एस .बी . देशमुख , मार्गदर्शक श्री . गुफरान अन्सारी , उपाध्यक्ष श्री . प्रदिप सांगळे, श्री . पुरुषोत्तम रकीबे , परवेजा शेख , अशोक कदम, बी डी . गांगुर्डे ,माध्य.शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर ,डी . एस . ठाकरे , एस ए . पाटील , ए . जे . बागुल , बी . के . नागरे, सी. पी . कुशारे ,गायकवाड आर एस , अनिल माळी, घरटे एस एन , सचिन दिवे , इरफान शेख , पी पी सानप , बी.बी पाटील ,एस एन सानप, बी एस बोराडे , संजय गिते, बाळासाहेब देवरे , वाकचौरे सर आलगुन ,बी आर देवरे, वाय एस टोपे ,बी आर भामरे , एल व्ही खैरनार, बी वाय शिंदे ,आर टी जाधव, बी के सानप, मंगेश आव्हाड, एस सी खैरनार, एस बी सोनवणे, आर बी राठोड , बाबासाहेब खरोटे, विठोबा ध्यानदान , ज्ञानदेव दिवे , त्र्यंबक मार्कंड ' बी व्ही पांडे , आर बी एरंडे, बी आर खैरनार, डी . बी . डोंगरे, पंडीत मढवई , के . डी.देवढे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली . सुत्रसंचालन बी के सानप यांनी केले तर आभार प्रदिप सांगळे यांनी मानले*
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .