शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विक्रमजी काळे व युवा प्रतिष्ठान नांदेडचे निमंत्रक श्री मिलिंद देशमुख यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोख्या पध्दतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील वर्ग 5 च्या नियमितपणे घरचा अभ्यास पूर्ण करणाऱ्या मुलांना युवा प्रतिष्ठान नांदेड कडून शैक्षणिक साहित्य  वाटप करण्यात आले. 


सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण सुरू असून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सेतू अभ्यासक्रमाची  निर्मिती केली असुन याची अंमलबजावणी शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी सुरू केला असून मुले चांगला प्रतिसाद देत आहेत त्यांनी राबवित असलेले सर्व उपक्रमाची माहिती  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष देवीदास बस्वदे  राज्य संघटक चंद्रकांत मेकाले, सरचिटणीस प्रल्हाद राठोड , यांनी घेतली मुलांशी  संवाद साधला व त्यांच्या अभ्यासाच्या वह्या पहिल्या व समाधान व्यक्त करून मुलांचे व वर्गशिक्षक ढगे सर यांचे अभिनंदन केले यावेळी त्याच्या  हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या वापट करण्यात आल्या यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ  जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर  उपक्रमशील शिक्षक रवी ढगे उपस्थित होते .




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)