नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
सध्या शाळा बंद पण शिक्षण सुरू असून राखी पोर्णिमेनिमित्त आज शाळेला सुट्टी असून सुद्धा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी वर्क फॉर्म होम अंतर्गत नियमितपणे ऑनलाईन क्लास घेत असून आज तास घेऊन त्यांनी मुलांना राखी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले यात मागील दोन वर्षी पासून शाळेतील मुले राखी पौर्णिमेला शाळेच्या परिसरातील झाडांना राखी बांधून निसर्गाप्रति आपली सामाजिक बांधीलकी जपत आहेत.
शाळेच्या परिसरात व शाळेच्या बाहेरील बाजूस तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे ,शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर व गावकऱ्यांच्या, शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते लावण्यात आलेली सर्व लावलेली झाडे टिकलेली आहेत तसेच यामुळे शाळेच्या सौदर्यात भर पडली आहे तसेच उन्हाळ्यात पक्षांची सोय झाली तर केंद्रावर येणाऱ्या सर्वांना आपली वाहने लावण्यासाठी सावली उपलब्ध झाली तर मुलांना या झाडाखाली बसून आभ्यास,खेळता येत आहे या सर्व बाबींचा विचार करून वर्ग 5 वीच्या मुल व मुलांनी शाळेत जाऊन सर्व झाडांना राखी बांधून तू आम्हाला सावली दे आम्ही तुझी काळजी घेऊ असा जणू संवाद साधला यामुळे परिसरातील लोकांनी मुलांचे कौतुक करत.
हा उपक्रम संस्कृती येडे, युवराज तर्फेवाड, साक्षी पुणेबाईवाड, साक्षी तर्फेवाड, अक्षरा इरेवाड, माधुरी कोंडेवार,दिव्या लोंढे, अभिजित लांडगे, संदेश वाघमारे, वैष्णव झिने आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .