पीआरसीचा दौरा अन आर.आर. जाधव सरांची कविता !

शालेयवृत्त सेवा
0

 



दौरा पीआरसी चा


काय सांगु भाऊ

या पिआरसीची भिती

अस वाटे कैकाची

होते आता माती

उठता बसता मले

राज्या पिआरसीच दिसे

दचकून उठो सपनातबी

भास होत असे

पंधरा दिसापासून

नाही घराकडे लक्ष

कागदपत्र जमवण्यात

झालो होतो दक्ष

समद्यासंग गोड बोलून

केली होती लुगाई

काही शाळेत दिसत नन्हती

मनासारखी सफाई

डोक फिरे पाहून माहय

संडासाच्या सिटा

त्याच्यामध्ये दिसे मले

दगड अन् विटा

मनावर घेतल साऱ्यानच

गति दिली कामाला

घोर नव्हता राह्यला आता

माह्यावाला जिवाला

कार्यालयात पाहणीच

सुरु केल सत्र

फाईलमध्ये जाऊन बसली

सगळी कागदपत्र

आता वाटे पिआरसी

येऊनजाव बुवा

काम पाहून हातावर

ठेवल आपल्या खवा

तयारी ठेवली अशी

बत्ति झाली नाही गूलं

आले असते तरी

हाती ठेवले असले फूलं

तयारी होती साऱ्यांचीच

हेही नव्हत थोडं

सगळेच म्हणते आता 

गंगेत न्हाल घोडं


 -आर आर जाधव

के प्र/ शिविअ किनवट जि.नांदेड

 ( पिआरसीच्या काळात अतिशय मेहनत घेणाऱ्या सर्व बंधू/ भगिनीना समर्पित )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)