मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सलाम मुंबई फाउंडेशन द्वारा निवड झालेल्या ०५ व्हिडीओचे सादरीकरण आणि सत्कार समारंभ ऑनलाइन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
राज्यस्तरीय भव्य व्हिडीओ बनविणे स्पर्धेसाठी
१. शालेय अभ्यासक्रमातील तंबाखू नियंत्रण संदेश.
२. निश्चय करा - तंबाखू सेवन न करण्याचा (Commit to Quit Tobacco)
या विषयावर व्हिडीओ तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील १०४ शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन चांगले व्हिडीओ बनवून चांगला प्रतिसाद दाखवला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी असल्याचे सलाम मुंबई फाऊंडेशनने म्हटले आहे.
यामध्ये विजेत्या स्पर्धकांची नावे -
१. श्री. सलमान वकार खान, सहा. शिक्षक, शाहू बाबू उर्दू हायस्कूल, पातूर, पातूर, अकोला.
२. श्री. अजय लिंबाजी पाटील, पदवीधर शिक्षक, जि. प्राथ. शाळा राहनाळ, भिवंडी, ठाणे.
३. श्री. रवींद्र गुरुनाथ तरे, सहा. शिक्षक, जि. प्राथ. शाळा गोवे, भिवंडी, ठाणे.
४. श्री. चंद्रबोधी बी. घायवटे, सहा. शिक्षक, जि. प्राथ. शाळा चोंडी, राळेगाव, यवतमाळ, यवतमाळ.
५. श्री. राजेंद्र विठ्ठल पोटे, जि. प्राथ. शाळा आरनगाव, दुमला, शिरगोंडा, अहमदनगर.
या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खालिल मान्यवर उपस्थित होते.
१. मा. डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक, आरोग्य सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य)
२. मा. डॉ. अजयकुमार लोळगे, विशेषाधिकारी बालभारती पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (महाराष्ट्र राज्य)
३. मा. विशाल पाटील, लोकशाही न्यूज चॅनल, आऊटपुट एडिटर.
4, श्री. सचिन जाधव, निवड समिती सदस्य
मान्यवर उपस्थित राहून प्रेरणादायी मार्गदर्शन केलेत.
तसेच उपस्थित सर्व अधिकारी, संस्था प्रतिनिधी, शिक्षक या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.
पुनश्च सर्व विजेत्या शिक्षकांचे आणि सहभागी स्पर्धकांचे सलाम मुंबई फाउंडेशन कडून मनःपूर्वक आभार मानून ऑनलाईन कार्यकमांची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .