मुलाखत : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांची !

शालेयवृत्त सेवा
0

 




राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. उमेश रघुनाथ खोसे यांची "शालेयवृत्त" साठी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी मुंबई येथील शिक्षक श्री. उदय नरे यांनी विशेष मुलाखत घेतलेली. राज्यातील शिक्षकांना प्रेरणादायी ठरणाऱ्या या मुलाखतीत सरांनी आपला शैक्षणिक जीवनपट उलगडला आहे. प्रेरणादायी मुलाखत वाचकासाठी देत आहोत - संपादक.


 ◼️परिचय :

श्री. उमेश रघुनाथ खोसे 

सहशिक्षक 

जि.प.प्रा.शाळा जगदंबानगर कडदोरा 

ता.उमरगा जि. उस्मानाबाद 

जन्मतारीख :- ११ ऑगस्ट, १९८७ 

प्रथम नेमणूक दिनांक :- १५ जून २००७ 

एकूण सेवा : - १४ वर्षे 

एकूण दोन शाळेत कार्य :

१. जि.प.प्रा. शाळा लमाण तांडा बेळब ता.उमरगा जि. उस्मानाबाद - १२ वर्षे 

२. जि.प.प्रा. शाळा जगदंबानगर, कडदोरा ता.उमरगा जि. उस्मनाबाद - २ वर्षे 


मिळालेले पुरस्कार :

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२१ 

राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार २०१८ 

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार - २०१७ 

महाराष्ट्र गौरव पुरस्कार 

जीवन गौरव पुरस्कार 

Nation Builder Award 

राज्य तंत्रस्नेही पुरस्कार 


नवोपक्रम :

बोली भाषेतून शिक्षण 

ऑफलाईन अप्प्स निर्मिती 

मनोरंजक खेळ निर्मिती 

आनंददायी शाळा 

वेबसाईट निर्मिती 

ऑनलाइन निकाल 

कृतियुक्त अध्यापन 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 




◼️आपली कौटुंबिक परिस्थिती काय?


लातूर जिल्ह्यातील माटेफळ या गावी माझा 1987 रोजी जन्म झाला. माझे वडील रघुनाथ खोसे हे शेतकरी आहेत. आई राजाबाई खोसे घर कामात सोबत शेतात काम मदत. संपूर्ण कुटुंब शेतावर अवलंबून असल्याने शेतीसोबतच दोघांनाही मजुरी करावी लागायची. त्यामुळे आम्ही भाऊ सुद्धा शिक्षणाबरोबरच सुट्टीच्या दिवशी शेतामध्ये मदत करायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रोजाने काम करणे शेतात मदत करणे जनावर राहणे इत्यादी काम केलेले आहेत. ही परिस्थिती बदलावी या उद्देशाने शिक्षण घेण्याचं ठरवलं. आज दोघेही शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत.


◼️आपलं शिक्षण कुठे झालं?


 माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माटेफळ तालुका जिल्हा लातूर माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय माटेफळ येथे झाला आहे. उच्च माध्यमिक शिक्षण जनता विद्या मंदिर मुरुड याठिकाणी घेतलं. माझं डीएड शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी झालेला आहे. नंतर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक व ignou दिल्ली या माध्यमातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.


◼️राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कोणत्या कार्याबद्दल मिळाला?


ग्रामीण भागातील मुलांना ही शहरी भागातील मुलासारखं आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. तसेच जिथे 100 टक्के बंजारा समाजातील लोक होती, त्यांच्या मुलांना बंजारा बोली भाषेतून शिक्षण देण्यासाठी इयत्ता पहिली चा पाठ्यपुस्तक बंजारा बोली मध्ये अनुवादित केलं. आनंददायी शिक्षणासाठी कलेतून शिक्षण असेल किंवा आउटडोअर लर्निंग असेल तसेच विविध उपक्रम राबवून आहेत. मुलांना कृतीतून शिकता यावं यासाठी ऑफलाईन इंटरॅक्टिव्ह ॲप्स बनवले तसेच मुलांना आनंददायी शिक्षण मिळावा यासाठी ऑनलाइन गेम बनवले. केवळ शिक्षणच नाही तर मूल्यमापन सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने व्हावा यासाठी केबीसी सॉफ्टवेअर असेल किंवा ऑनलाइन उपलब्ध माध्यमाच्या सहाय्याने मूल्यांकन केलेले आहे. ग्रामीण भागातील शाळा लोकांच्या सहकार्याने डिजिटल केले आहेत. तसेच शाळेतील पटसंख्या वाढली, व वर्ग वाढले व शिक्षक संख्या ही वाढली. केवळ संख्या वाढली नाही तर गुणवत्ता सुद्धा वाढली या कार्याची दखल घेऊन या वर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.


◼️आपण शिक्षकी पेशा कोणाच्या प्रेरणेने किंवा मार्गदर्शन आणि मिळवला?


मला आयुष्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होऊन एखादा अधिकारी व्हायचं होतं परंतु घरातील हालाखीची परिस्थिती पाहता सगळ्यात सोपा मार्ग नोकरी मिळवण्याचा म्हणजे डीएड करून शिक्षक होणे. यासाठी बारावीला उत्तम गुण असूनही मला शिक्षकी पेशाचा मार्ग निवडावा लागला. यात माझ्या गुरुजनांनी दिलेले संस्कार हे जपून त्या संस्काराप्रमाणे माजी विद्यार्थी करावे या उद्देशाने शिक्षकी पेशा निवडून आज उत्तम कार्य करत आहे. यासाठी आजपर्यंत ज्या गुरुजनांनी मला शिकवलं त्यांची प्रेरणा व मार्गदर्शन याचा मला लाभ झालेला आहे.


◼️शिक्षक म्हणून सुरुवातीला कुठे रुजू झालात?


 मी 2007 साली जूनमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा लमाण तांडा बेळंब या ठिकाणी रुजू झालो. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील ही महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा लगत असलेली शाळा. ज्या तांडा मध्ये 100% भटक्या-विमुक्त अशा बंजारा जमातीतील लोक राहतात. ज्या शाळेमध्ये इतर शिक्षक नियुक्ती घेण्यासाठीइच्छुक नसतात अशा ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली. जी आव्हाने समोर होती त्याला चॅलेंज म्हणून स्वीकारून काम करत गेलो व त्याचं फलित आज आपण पाहत आहोत.


◼️शाळेची परिस्थिती काय होते तीथे?


 मुलांचे शिक्षण याबद्दल तेवढी म्हणावे जनजागृती नव्हते. मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जायचे. शाळेतील उपस्थिती प्रमाण खूप कमी होते. शाळेत मुलांना शिक्षण घेण्यासाठी भाषेचा अडसर यायचा. तसेच आई वडील कामासाठी स्थलांतर करायचे त्यामुळे शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.दिवाळीनंतर लोक ऊसतोडीसाठी स्थलांतर करायचे. यावेळी शाळेत उपस्थिती ची मोठी समस्या होती.


◼️शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर आपल्यासमोर कोणते आव्हाने होते?


 शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर मी एका तांडा मध्ये रुजू झालो होतो जिथे 100 टक्के बंजारा समाजाची लोक राहतात. जिथे शिक्षणाबद्दल जास्त जनजागृती नव्हती, अशा ठिकाणी लोकांना शिक्षणाबद्दल जनजागृती करण्यासाठी वेळोवेळी जनसभा घेतल्या. तसेच शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गावातील महिलांना सामावून शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचे काम केलं. माझ्यासोबतच माझे सहकारी गृहभेटी करून पालकांना मुलांच्या शिक्षणाचे फायदे लोकांना समजावून सांगितले. यामुळे शिक्षणाबद्दल जनजागृती झाली शिक्षणाचे महत्त्व कळाले त्यामुळे मुले शाळेत येऊ लागली.


◼️अध्यापन करताना संशोधन वृत्ती कशी जोपासली?


 ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मुलांना शाळेची आवड निर्माण करणे, लोकांमध्ये शासकीय शाळा बद्दल दृष्टिकोन बदलणे यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे होते. या संशोधक वृत्तीतून मी मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण मिळावे यासाठी लोकांच्या सहकार्याने शाळा डिजिटल केली. तसेच मुलांना जिथं मोबाईलची रेंज नव्हती तिथं तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी ऑफलाईन ॲप निर्मिती असेल किंवा मुलांच्या सहकार्याने त्यांच्या सहभागाने व्हिडिओ निर्मिती केली असेल. तसेच मुलांना आनंददायी मूल्यांकन करता यावा यासाठी पीपीटी च्या साह्याने बनवलेले केबीसी सॉफ्टवेअर असेल याचा लाभ शाळेबद्दल दृष्टिकोन बदलण्यासाठी जास्त करा. तसेच भाषेची समस्या सोडवण्यासाठी बंजारा बोली भाषेतून तयार केलेले इयत्ता पहिलीचा पाठ्यपुस्तक हे सर्वांसाठी मार्गदर्शक असा उपक्रम ठरला. या शाळांमध्ये सध्या मुलांचे शिक्षणाबद्दल रुची कायम राहावी यासाठी मनोरंजनात्मक ऑनलाइन गेम्स बनविले. अशा वेगवेगळ्या समस्यावर मात करण्यासाठी नवीन उपक्रम राबवून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे.


◼️बोलीभाषेचा करण्यासाठी कसा उपक्रम हाती घेतला?


 मी लमाण तांडा या शाळेमध्ये काम करताना इयत्ता पहिली ला शाळेत येणाऱ्या मुलांना भाषेची समस्या जाणवायचे. हा तांडा महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेलगत असल्यामुळे व तांडा मध्ये 100% बंजारा जमातीची लोक राहत असल्यामुळे ही समस्या जाणवायचे. यावर उपाय म्हणून सुरुवातीला मुलान कडूनच मी बंजारा बोली भाषा शिकून घेतली नंतर त्यावर ती हळूहळू लोकांकडून त्यात दुरुस्त्या करू लागलो. शाळेतच सुभाष राठोड हे बंजारा जमातीचे असल्यामुळे ती भाषा शिकण्यासाठी अधिक मदत झाली. भाषा शिकल्यानंतर मुलाशी त्याच बोलीभाषेतून संवाद साधू लागलो त्यामुळे मुलांना घरासारखे वातावरण वाटू लागले. मुले आनंदाने शाळेत येऊ लागली. यामुळे मुलांची उपस्थिती वाढण्यास मदत झाली. तसेच मुलांना त्यांच्या भाषेतून कविता गायन असेल किंवा धडे शिकवला. यामुळे मुलांना आनंद वाटू लागला व मुले नियमित शाळेत येऊ लागते.


◼️ऑफलाइन ॲप्स निर्मिती कशी केली व त्याचा फायदा कसा झाला ती संकल्पना कुठून आली?


 ग्रामीण भागात काम करत असताना मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण मिळावे म्हणून काय करता येईल हा विचार करत होतो. परंतु आमच्या शाळेमध्ये मोबाईलला रेंज येत नव्हती अशा शाळेत मुलांना कृतीयुक्त कसं शिक्षण द्यावं हा विचार करत असताना ऑफलाईन याची कल्पना माझ्या डोक्यात आली? आपण पाहिलेला आहे की शहरी भागामध्ये मुलांना मोबाईल मध्ये गेम खेळण्यात मध्ये जास्त आवड असते तसेच आपण काय बनवले तर मुलांना शाळेची आवड लागेल व ते नियमित शाळेत येतील म्हणून हे निर्मिती हातात घेतली. यासाठी मला युट्युब वर गुगल यांच्या माध्यमातून माहिती मिळवून मी निर्मिती करण्यास सुरुवात केली. यासाठी जे वेगवेगळे फ्री प्लॅटफॉर्म आहेत त्याचा वापर करण्यासाठी सुरुवात केली व त्याच्या साह्याने मुलांना शाळेत त्या बोलती खेळण्यासाठी ते ॲप्स दिले व मुले शाळेत रमू लागली.


◼️यासाठी आपले काही तांत्रिक शिक्षण झाले आहे का?


 माझे कोणतेही यासाठी आवश्यक असे तंत्रज्ञानाचे शिक्षण झाले नाही? केवळ आवड म्हणून मी या मध्ये उतरलो आणि मुलांना आनंददायी शिक्षण देता यावे यासाठी वेळ देऊन असे काही साहित्य करण्यात तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.


◼️आपला छंद काय? आपल्याला काय करायला आवडते?


 मला माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये रमायला जास्त आवडते. यासाठी नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आनंदी शिक्षण कसे देता येईल याचे संशोधन करणे हा एक माझा छंद आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या वापरातून मुलांना आनंददायी शिक्षणासाठी साहित्य तयार करणे. मला अवगत असलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ माझ्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक वर्गाला व्हावा यासाठी काम करायला आवडतात. तसेच मी माझ्या तंत्रज्ञानाचे ज्ञानातून विद्यार्थ्यासाठी साहित्य बनवणे आणि हे बनवताना मुलांना आनंद कसा मिळेल याचा विचार करणे हा एक छंद आहे.


◼️आपण शाळा कशा डिजिटल केल्या?


 कोणत्याही शाळेच्या भौतिक विकासासाठी आवश्यक असतो आर्थिक पुरवठा. यासाठी सुरुवातीला मी व माझे सहकारी यांनी वर्गणी करून शाळेचे रंग रंगोटी असेल किंवा छोटे छोटे साहित्य शाळेत उपलब्ध केले ज्यामुळे लोकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर रोजगार करणाऱ्या लोकांना शाळेला मदत करण्यासाठी आवाहन केले यामध्ये गावातील महिला वयोवृद्ध तसेच तरुणांनी सहभाग दोन शाळा डिजिटल करण्यासाठी मदत केली. सध्याच्या कडदोरा गावामध्ये ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या सहकार्याने व तरुण मित्र वर्गांच्या योगदानाने शाळा डिजिटल करण्यासाठी मदत झालेली आहे. यासाठी गावातील लोकांनी बहुमोल असे सहकार्य करून शाळेच्या विकासासाठी हातभार लावलेला आहे.


◼️शिक्षण क्षेत्रात येण्याचा विचार का केला?


  घरातील आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ळे बारावीला चांगले गुण मिळवून हे लवकर नोकरी लागते या उद्देशाने हा शिक्षकी पेशा निवडला होता. जो पेशा निवडला त्यात प्रामाणिकपणे कार्य करायचं हे ठरवून. होतं जसं ठरवलं तसा आज पर्यंत विद्यार्थी विकासासाठी कार्य करत राहिलो आणि आज आपल्यासमोर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घेऊन व्यक्त होत आहे.


◼️विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय प्रयत्न केले व या समाजाचा काय सहभाग घेतला?


 विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यांचा शारीरिक भौतिक व मानसिक विकास झाला पाहिजे. या उद्देशाने ग्रामीण भागातील शाळा असूनही शाळेतील भौतिक सुविधा तसेच विद्यार्थी विकासासाठी आवश्यक असलेले साहित्य लोक वाक्यातून जमा केले. शाळेतील मुख्याध्यापक श्री राम पुजारी यांच्या संकल्पनेतून आम्ही शिक्षण संस्थान सप्ताह घेतला ज्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने सात दिवस निवासी मुले शाळेत ठेवून त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या यासाठी लागणारा सर्व खर्च गावकऱ्यांनी केला यासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च गावातील नागरिकांनी करून एक उत्तम असा दिशादर्शक उपक्रम महाराष्ट्राला दिला तसेच शाळेतील विविध उपक्रमांमध्ये गावातील नागरिक व महिलांना सामावून शाळेबद्दल दृष्टिकोन बदलण्यासाठी कार्यक्रम घेतले आदर्श माता सन्मान असेल किंवा वेगवेगळे सण उत्सव शाळेत साजरे करण्यात येईल यामध्ये गावातील नागरिकांचा सहभाग घेण्यात येत होता.


◼️कोरोनाच्या काळात कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहिलात?


 कोरोना साहित्य कक्षामध्ये आम्हाला सर्व शिक्षकांना कार्य करण्यासाठी ड्युटी होत्या त्यावेळेस गावातील पालकांना ऑनलाईन क्लास मध्ये कसे सहभागी व्हायचे यासाठी धूम असेल किंवा गुगल मिडिया याची माहिती दिली तसेच दररोज सकाळी नऊ वाजता वँटसअँप व साध्या टेक्स्ट मेसेज द्वारे अभ्यास पाठवून मुलांचा दररोज अभ्यास घेत आहे गेली 365 दिवस झाली आमची शाळा निरंतर सुरू आहे जसा दर वर्षी 1 मे रोजी निकाल जाहीर होतो त्याप्रमाणे आक्रमणाच्या काळात ही शाळेची स्वतः वेबसाईट बनवली व त्यावर शाळेचा दहावी बारावी प्रमाणे ऑनलाईन निकाल लावला अशी ऑनलाईन निकाल लावणारे एकमेव जिल्हा परिषदेची शाळा आहे आहे. तसेच केवळ ऑनलाईन शिक्षणातून सर्व काही साध्य होणार नव्हते या उद्देशाने पोटावरची शाळा असेल किंवा स्वाध्याय पुस्तिका वाटत असेल असे वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन आम्ही ऑफलाइन ही शिक्षण सुरू ठेवले यासाठी गावातील तरुण व शिक्षणप्रेमी नागरिक यांचीही वेळोवेळी मदत झालेली आहे. 


◼️शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी तुम्हाला कशी मदत केली?


 

 जेव्हा मी हे नाविन्यपूर्ण काम करत होतो त्यावेळी माझे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन देण्याचे काम केलेला आहे जसं 2016चा प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी तत्कालीन शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे जिल्ह्यापासून 80 ते 90 किलोमीटर अंतर दूर असूनही सकाळी सात वाजता मुलांचा बैलगाडीतून प्रवेशोत्सव साजरा केला होता तसेच गटविकास अधिकारी असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील यांनीही या प्रवेशोत्सव कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी सहभाग नोंदवला आहे शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असताना डायट प्राचार्य असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील यांनी वेळोवेळी उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन देऊन नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे यामुळे नक्कीच आमला शाळा व विद्यार्थी विकासासाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळत गेली.


 

◼️आपल्याला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार एकाच वर्षात मिळाले याबद्दल आपले मत काय?


 महाराष्ट्रातील एवढ्या कमी वयामध्ये व कमी सेवेमध्ये जे शिक्षकासाठी मिळणारे सर्वोच्च दोन पुरस्कार आहेत ते म्हणजे एक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व दुसरा राष्ट्रीय पुरस्कार हे दोन्ही मिळेल होणारा कमी वयातील एकमेव शिक्षक आहे सलग 14 वर्ष शैक्षणिक कार्य करत असताना कधी या पुरस्कारा संबंधी आवश्यक असणारा डाटा माझ्याकडे जमा झाला मला कळलेही नाही ज्या वेळेस या पुरस्काराचे निकष पाहिले त्यावेळेस लक्षात आले की आपल्याकडे सर्व बाबी आहेत मग आपण हे प्रयत्न करावे या उद्देशाने स्वतः फॉर्म भरला आणि ऑनलाईन मुलाखती देत गेलो आणि निकालाची वाट पाहत होतो वाटलं नव्हतं की एकाच महिन्यांमध्ये म्हणजे 30 जून रोजी राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला व व 18 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला केवळ दीड महिन्यांमध्ये दोन्ही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने नक्कीच आनंद होत आहे हे पुरस्कार मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना समर्पित करत आहे


 

◼️आपल्या दृष्टीने पुरस्काराचे काय महत्व आहे आहे?


 माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की पुरस्कारामुळे नक्कीच कार्य करण्याची प्रेरणा मिळत जाते यामुळे शिक्षकांना काम करत असताना ऊर्जा मिळते निरंतर सर्वांचे काम सुरू राहतो त्यामुळे जे काम करतात त्यांनी नक्कीच अशा पुरस्कारांना आपल्या करून आपल्या काम सिद्ध करा आवर पुरस्कारामुळे आपल्याला केलेल्या कामाची पावती मिळते. 



◼️यापुढे आपली शैक्षणिक वाटचाल काय राहील?



 यापुढेही मी निरंतर माझ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण आनंददायी व कृतियुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन महाराष्ट्रात एक दिशादर्शक मॉडेल स्कूल स्थापन करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्याकडून जे काही शिक्षकांना मी मार्गदर्शन करता येईल येईल ते मार्गदर्शन करत राहा यापूर्वीही आम्ही महाराष्ट्र एडमिन पॅनल या ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांना तंत्रस्नेही करण्यासाठी किंवा हा उपक्रम राबवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करत आलेलो आहोत.


माझं नेहमी म्हणणं असं आहे की जीवनात असं काही ठेवा की जे तुम्हाला अशक्य वाटेल आणि त्यात हे दृष्टीने आपली वाटचाल ठेवा यश नक्कीच आपल असेल. काम एवढं शांततेत करा की यश आनंद जल्लोष केला पाहिजे असे आमचे गुरु नेहमी म्हणायचे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात असं काहीतरी करा की ज्यामुळे नक्कीच आपल्याला यामध्ये यश मिळेल आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम शिकायला मिळेल.

- उमेश खोसे ( राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक )




 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)