नांदेड जिल्हा हैदराबाद संस्थानात होता त्यामुळे स्वातंत्र्याची पहाट पाहण्यासाठी नांदेडसह मराठवाडयातील जनतेला १५ आगस्ट १९४७ नंतर तब्बल एका वर्षाची प्रतिक्षा करावी लागली. हैदराबादच्या जूलमी अत्याचारी रझाकार व निजाम सरकारच्या त्रासाने येथील जनता अक्षरशः होरपळून गेली होती.जनतेच्या लढयाने व भारतीय लष्कराच्या अॅक्शनमुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट उगवली.
ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतात 563 संस्थाने होती, त्याचा राज्यकारभार देशीराजे व संस्थानिक बघत असतात त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद. होय या संस्थानाची स्थापना हैदराबाद राज्याचे मीर कमरुद्दीन निजाम यांनी सतराशे चोवीसमध्ये केली होती .सतराशे चोवीस ते एकोणिसशे अठेचाळीस पर्यंत हे राज्य अस्तित्वात होते..15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले सुमारे दीडशे वर्षाच्या गुलामगिरीच्या श्रृंखलेतून मुक्ती मिळाली होती. मात्र मराठवाड्यातील जनता अजूनही पारतंत्र्यातच होती. हैदराबाद राज्य हिंदुस्थानच्या मध्यभागी वसलेले राज्य होते .हिंदुस्तानात असलेल्या देशी राज्यात काश्मीर राज्य आकाराने सर्वात मोठे हैदराबाद राज्य आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे होते.18 जुलै 1947 मध्ये ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला या कायद्यानुसार 15 ऑगस्ट1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले भारतातील सर्व देशी राज्ये आणि संस्थानिक राज्य संघराज्यात विलीन झाली. मात्र हैदराबाद राज्याचा सत्ताधीश मीर उस्मान अली खान आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे जाहीर केले .देशाच्या मध्यभागी असलेले आणि देशात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे असलेले हे राज्य स्वतंत्र राहणे देशाच्या हिताचे तर नव्हतेच त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त होणारच नव्हते.हैदराबाद राज्यातील राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण यासाठी अनेक सशस्त्र आंदोलने झाली.स्वातंत्र्यसंग्रामाची सुरुवात सर्वप्रथम आर्य समाजाने आणि त्यानंतर हैदराबाद स्टेट काँग्रेसने या आंदोलनाचे नेतृत्व केले
हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनाचे सुरुवात मराठवाड्यातील औरंगाबाद या शहरातून वंदे मातरम या सत्याग्रहातून झाली.राज्यात हैदराबादला उस्मानिया विद्यापीठ तर औरंगाबाद ,वरंगल व गुलबर्गा येथे इंटरमिजिएट कॉलेज होती. औरंगाबादच्या कॉलेजमध्ये गोविंदभाई श्रॉफ हे गणिताचे शिक्षक होते . ते व विष्णु गोविंद कर्वे यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती निर्माण केले म्हणून गोविंदभाईंना नोकरीवरून कमी केले. कॉलेजच्या वस्तीग्रहात हिंदू विद्यार्थ्यांनी 14 नोव्हेंबर 1930 पासून कॉलेज प्रशासनाच्या प्रशासनाचा विरोध पत्करून प्रार्थना म्हणून वंदे मातरम गीत म्हणण्यास सुरुवात केली. वंदे मातरम चळवळीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना निजाम सरकारने शाळेतून काढून टाकले सरकारच्या दडपशाहीमुळे शैक्षणिक नुकसान झाले पण अशा सत्याग्रहामुळे संस्थानात जनजागृती झाली. कार्यकर्त्यांची यांची एक फळी निर्माण झाली आणि स्वातंत्र्य आंदोलनाचा पाया मजबूत होण्यास मदत झाली.
15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचे स्टेट काँग्रेसने ठरवले 15 ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा, झेंडा सत्याग्रह करावा असे आवाहन स्वामीजींनी जनतेला केले होते. संघराज्यात चा झेंडा लावला तर दोन वर्षाची शिक्षा जाहीर केले तरीसुद्धा 15 ऑगस्टला नांदेडच्या स्टेशनवर झेंडा फडकविण्यात आला. केंद्राच्या पोस्टऑफिस वरही ध्वजाला सलामी देण्यात आली.नांदेडच्या एम्पीरियन बँकेच्या शाखेवर ही झेंडा लावण्यात आला.सतरा ऑगस्टला नांदेडला सराफ्यात झालेल्या झेंडा प्रकरणात बळवंतराव बोधनकर व विनायकराव डोईफोडे यांच्यावर अटकेचे वॉरंट काढले डोईफोडे यांना अटक झाली.
हदगाव तालुक्यातील डोरलीला अशाच प्रकरणात गोळीबार झाला. तेथे झेंडावंदनाचा व जंगल सत्याग्रह हा कार्यक्रम आखला होता उमरी ,पाथरड ,सोनारी व आजूबाजूच्या खेड्यातील लोक पावसाची पर्वा न करता त्या गावी जमा झाले तामसा पोलिस ठाण्याच्या आमचा पोलिस ठाण्याचा अमिन पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी येऊन केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला. हदगाव तालुक्यात असलेल्या शिरड गावी 15 ऑगस्ट 1948 ला राष्ट्रीय झेंडा फडकवला व झेंड्याला सशस्त्र सैनिकांनी रायफली सलामी दिली या समारंभाला दक्षिणकर सर्कल इंस्पेक्टर, मंजिथराव देशमुख व इतर गावातील मान्यवर मंडळी हजर होते भगवानराव गांजवे यांनी या झेंड्याला सलामी दिली .32 गावे स्वतंत्र झाल्याची घोषणा यावेळी केली. या प्रकरणानंतर निजाम पोलिसांची घाबरगुंडी उडाली पण त्याआधी सीताखांडी ,लालसिंग तांडा ,आमठाणा तांडा असे काही तांडे पोलिसांनी जाळून टाकले . चितगीरीचे चंद्रू नाईक, त्याचा भाऊ लालसिंग व आणखी दोन तीन जणांचे पोलिसांनी खून केले त्याचा प्रमुख नाईक आनंदा मंचा पोलीस अत्याचाराला बळी पडला.
उमरखेड कॅम्प कडून 15 ऑगस्ट हा दिवस निजामी हद्दीत साजरा करण्याची तयारी होती भोकर मधील सोनारी गावच्या लोकांनी दोघा पोलिसांना पकडून बंद करून ठेवले होते. सोनारीचे माली पाटील भुजंगराव त्यांनी गावाच्या संरक्षणासाठी बंदुका जमवल्या.बंदुकीच्या बारूद डबेच्या डबे तयार करून ठेवली होती.हैदराबादला पाठवून फुले (कॅप्स) मागविल्याची खबर मिळताच भोकर पोलीस ठाण्यातून दोन पोलीस झडती घेण्यासाठी पाठवले होते ठेवले होते .भूजंगरावांनी त्यांना पकडून ठेवले होते.या घटनेचे वृत्त पोहोचतात नांदेड . जिल्ह्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी हैदराबादहून मदत मागवली मोठी फौज आली पण सामोपचाराने प्रश्न मिटवला होता .आठ दहा गावाचे गावकरी आठ-दहा गावांचे गावकरी सोनारीचे रक्षण करण्यासाठी धावून आले होते सुटका केल्यानंतर भुजंगराव यांना पकडले नाही.
हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कृती समितीने राज्यातील जनतेला जंगल सत्याग्रह करण्याचा आदेश दिला. मराठवाड्यात 25 ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले पाटनूर चा जंगल सत्याग्रह प्रसिध्द आहे त्यावेळी दहा अकरा लोक पकडले गेले आंदोलनाचा पवित्रा पाहून पोलिसांनी त्यांना सोडून दिले व नंतर मुदखेड खाण्यातून बाराशे लोकांवर एफआयआर निघाला. नांदेड जिल्ह्यातील टेळकी येथील जंगल सत्याग्रह झाला. तेथे झालेल्या गोळीबारात रघुनाथराव हंबर्डे, मोतीराम लक्ष्मण, भिकाजी तुळशीराम व धोंडीबा काळे मरण पावले.
किरगुळ शेतकऱ्यानी लेव्हीविरुद्ध लढा दिला व लढ्यात इथल्या शेतकऱ्यांनी पोलिसांना सळो कि पळो करून सोडले सरकार आणि कामात अडथळे म्हणून येथील चाळीस लोकांना किरगुळ ईटोली व आसपासच्या गावात जाऊन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पकडले . तेव्हा स्वामीजी व हैदराबादचे मजूर पुढारी व्ही.बी .राजू यांनी या भागाचा दौरा केला. किरगुळ, पळशी, म्हैसा, किनी ,पाळज या गावांना भेटी दिल्या पाळजला त्यांनी मुक्काम केला होता. तेथील मल्लारेडी आदी कार्यकर्ते आपल्या गावच्या कार्यकर्त्यांना घेऊन सत्याग्रह केला.भोकर व म्हैसा येथील रझाकारांनी किनीमध्ये धाड टाकली सोने-नाणे लुटून किनी पाळज गावाची राखरांगोळी केली. भोजन्ना बोईलवाड,चिकू आयतालवाड, मुत्येन्ना नरसापुरे, श्रीमती पोसानबाई गोलवाड व अन्य दोन परगावचे मजूर यांचा खून केला.
गोविंद विनायक पानसरे हे हैदराबाद चे राहणारे जन्माने औरंगाबाद जिल्ह्यातले बदनापूरला इंटर पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी सोडून जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडण्याचे व निवारण करणे हे त्याचे व कार्य .त्यांच्यावर मुधोळ तालुक्याच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. कोंडलवाडीच्या रजाकाराने अर्जापूरच्या वेशीजवळ पानसरे यांची तलवारीने हत्या केली.त्यांच्या सोबत असलेला पंधरा सोळा वर्षाच्या हंगीरग्याच्या पुंडलिक पाटलावर सुध्दा तलवारीने वार करून जखमी केले.
२१डिसेंबर १९४६ ला सायंकाळच्या वेळी उमरी स्टेशन येथील आर्य समाजाचे तरुण तडफदार कार्यकर्ते दत्ता उत्तरवार यांचा हैदराबादच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अरब पहारेकर्यांनी शुल्लक कारणावरून खून केला.
नागेलीला पोलीस घोडदळांचा वेढा, उमरीचे बँक ऑपरेशन, इस्लापूर पोलीस ठाण्यावर हल्ला.कल्हाळीचे हत्याकांड देगलूरमधील हणेगाववरील रझाकारांची धाड, लोहा गावावर झालेला रझाकारांचा हल्ला व लूटालूट, अशा अनेक हिंसक घटनांचा साक्षीदार नांदेड जिल्हा आहे. निजाम व रझाकारांच्या जूलमी अत्याचाराला संपूर्ण मराठवाड्यातील जनता कंटाळून गेली होती. नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे उभे राहणारे प्रसंग येथील जनतेने त्या काळी अनुभवले.
13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य पोलीस कार्यवाही करावे लागली या घटनेला ऑपरेशन पोलो असेही म्हणतात .भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई केली होती परंतु लष्करी कारवाई म्हटल्यास कायदेशीर प्रश्न निर्माण होईल या कार्यवाहीस पोलीस अॅक्शन असे नाव कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविले त्यामुळे भारताचा अंतर्गत अंतर्गत ठरणारा होता.स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू यांनी पंडित नेहरू ,महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी चर्चा करून पोलीस कार्यवाही करण्याची विनंती केली होती त्यामुळे 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे चार वाजता पोलीस कार्यवाही सुरू झाली. भारतीय लष्कर पाच भिन्न दिशेने हैदराबाद राज्यात प्रवेश करून निजामी पोलीसांशी झुंज दिली रझाकार व निजामी पोलीस भारतीय लष्करा पुढे टिकलेनाहीत. 17 सप्टेंबर ला सायंकाळी पाच वाजता निजाम मीर उस्मान अली खान बहादुर या निजामाने रेडिओ स्टेशनवर भाषण केले व आपण युद्ध थांबवित असल्याची घोषणा केली.त्यानंतर हैदराबाद लष्कराचे प्रमुख शरण आले. 109 तासात कारवाई पोलीस कार्यवाही यशस्वी झाली हैदराबाद राज्यातली जनता निजामाच्या जाचातून मुक्त झाली. स्टेट कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली .मेजर जनरल चौधरी हैदराबाद राज्याचा राज्य कारभार ताब्यात घेतला व पुढील चौदा महिने तेथे लष्करी राजवट होती.
मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यात अर्थात अखंड भारत निर्मितीच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या व मुक्तीलढयात कार्य केलेल्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. !
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .