मह्या गावाचं मोठेपणं ! रमेश मुनेश्वर यांची कविता ..

शालेयवृत्त सेवा
0


 

 मह्या गावाचं मोठेपणं !



निसर्गाच हे देनं मह्या मराठवाडीला 

झाडी झुडीत विसावला हा सावळा मावळा



गर्द हिरवळीत कसा निपजला राजा 

किती करावे कौतुके ऊर भरुनी माझा



दऱ्याखोऱ्यात वाहे गोदावरी पैनगंगा 

वाडी - तांड्यातला बंधू हाय कसा चंगा



जीवाले लावतोय जीव गावकरी तो असा 

सुखा-दुखा:त धावूनी येतो भाऊराया जसा



आमची आदिम जमात भटकंतीत बंजारा 

विविधतेत नटलेला आमचा परिसर सारा



मह्या गावाचा मोठेपणं कसं वर्णू मी दादा 

सर्व धर्माचा भारत जसा नांदतो कायदा !



- रमेश यादवराव मुनेश्वर

                           संवाद : ८८८८७०१८९६

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)