१७ सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो “ मराठवाडा मुक्तिसंग्राम” ! आपल्या अज्ञानाची सुरुवातच मुळी याठिकाणाहून होते. कारण तो मराठवाडा मुक्तिसंग्राम नसून हैद्राबाद मुक्तिसंग्राम आहे.१७२४ ते १९४८ अशी सलग २२४ वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. मग हा निजाम म्हणजे कोण ? हेही माहीत असले पाहिजे. त्यानुसार निजाम हे काही कुठल्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले गेले. वास्तविक पाहता २०० वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक ! मुल्क म्हणजे जमीन किंवा परिसर. आणि त्यानुसार परिसराची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम. त्यानुसार दिल्लीच्या मोगल बादशहाचा दक्षिणेतील एक महसुली अधिकारी म्हणजेच निजाम.
१७२४ ला मोगलांचा सुभेदार म्हणून काम करताना पहिला निजाम मीर कमरुद्दीन खानाने औरंगाबाद याठिकाणी स्वत:ची स्वतंत्र गादी निर्माण केली.१७६७ नंतर निजामाने आपला कारभार हैद्राबाद येथून चालवायला सुरुवात केली. निजाम हा धर्माने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांकित हिंदू सरदारांनी शेवटपर्यन्त चाकरी केलेली आहे. त्यात छत्रपती संभाजीच्या बहीणीचे नातू रावरंभा निंबाळकर, सेनापती धनाजी जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या निंबाळकरांचे वारसदार सुलतानजी निंबाळकर, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्या हिम्मतबहाददूर विठोजी चव्हाणांचे चिरंजीव उदाजी चव्हाण यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो.
मराठवाडा मुक्तिसंग्राम - जुनागड आणि हैद्राबाद मध्ये लोकसंख्या बहुसंख्येने हिंदू होती आणि राजा मुस्लिम होता.काश्मीर मध्ये लोकसंख्या बहुसंख्येने मुस्लिम होती पण राजा हिंदू होता .जुनागडच्या राजा विरूद्ध लोकांनीच बंड केल तो घाबरला आणि पाकीस्थान मध्ये पळून गेला. हैद्राबादच्या निजामाच तस झाल नाही इतर सर्व संस्थानिकांशी झाला"सामिलीकरणाचा तह,करार"पण हैद्राबादच्या निजामाशी जो झाला आणि भारतीय नेतृत्वाने स्विकारला त्याला म्हणतात "डाक्युमेंट आॕफ असोशियशन"सहकार्य .त्या कराराचा अर्थ हा आहे."भारतीय नेतृत्वाने मान्य केल हैद्राबाद संस्थान वेगळ,त्याच लष्कर वेगळ,त्याच परराष्ट्र धोरण वेगळ आपल्याला माहीत नसत त्यामुळे ऐकायला आश्चर्य वाटत.आपला देश १९४७ ला स्वतंत्र झाल्यावर सुध्दा त्यावेळच्या राजकीय नेतृत्वाने मान्य केल होत,की हैद्राबादची सैना स्वतंत्र असेल,निजामाचा झेंडा स्वतंत्र असेल,त्याला वेगळ परराष्ट्र धोरण ठेवायला परवानगी असेल.अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत तो म्हणेल ते करायच हे सगळं मान्य केल होत.तेवढ ऐकून जर निजाम गप्प बसला असता तर आज भारतात करेक्ट मध्ये आणखी एक पाकीस्थान दिसल असत.
आमच राष्ट्र काय याविषयी ज्यांच्या भोंगळ कल्पना होत्या त्यांच्या कृपेने दिसल असत आणखी एक मध्ये राष्ट्र.पण आमच्यावर दोन उपकार झाले, १)एक म्हणजे हा निजाम जास्त लोभी निघाला. तो जर मिळालं त्याच्यावर थांबला असता तर ते वेगळ राष्ट्र म्हणून continue झाल असत.निजामानी भारतीय विमानाना हैद्राबाद संस्थानातून जायला बॕन घातला.तो मान्य करून भारताची उत्तरेकडून येणारी विमान हैद्राबादला वळसा घालून मद्रासला जाऊ लागली.म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध झाले,निजाम आणि भारत सरकार.आमच्या हवेतून तुमच विमान जाऊ द्यायचं की नाही हे तो सांगणार आणि ते आम्ही मान्य केल होतं. पण निजामाने स्वतंत्र युनायटेड नेशन मध्ये युनोच सदस्यत्व मागितल.
स्वातंत्र्याची चळवळ मोडून काढण्यासाठी निजामाने काशीम रझवीच्या नेतृत्वाखाली एक संघटना उभारली.त्या संघटनेलाच रझाकार असे म्हणतात.रझा म्हणजे सेवा धर्माची सेवा करणारे.ही संकल्पना सगळ्या धर्मांमध्ये आहे.नावाला रझाकार घुसायच आणि जनतेवर अत्याचार करायचे.संस्थानातील अरब सावकारांच्या मदतीने निजामानं बाहेरून अरब सैन्य मागवले होते.निजामाचे लष्कर होतेच.सिडने काॕटन नावाच्या कुविख्यात जागतिक गुंडाने रझवीला शस्ञास्ञे पुरवण्याचा उद्योग चालू ठेवला होता.सिडने काॕटन पोर्तुगीज हुकूमशाहा सालाझारच्या परवानगीने राहत होता. साम्राज्यवादी शक्तींच्या पाठिंब्यामुळे कासिम रझवी भारतावर गुरगुरत असे."आझाद हैद्राबादच्या आडवे कोणी येऊ शकणार नाही .हिंदूस्थानला मिळालेले स्वराज्य हे फाटक्या वस्ञासारख्ये आहे.नवनिर्मित हिंदूस्थान अनेक अनपेक्षित समस्यांमुळे दुबळा झाला आहे.आमच्या राज्यावर आक्रमण करण्याची त्यांची हींमत नाही.आणि हिंदूस्थानची फौज आलीच तर माझे अडीचलाख सशस्त्र रझाकार व निजामाचे लष्कर त्यांना तोंड देईल.या कामी आपणास पाकीस्थान नक्कीच मदत करील.
एकदा आझाद हैद्राबादमध्ये पाय रोवल्यानंतर मी दिल्लीच्या किल्यावरही निजामाचा आसफजाही झेंडा फडकवीन" अशा वल्गना करत होता.त्यांनी भारताच्या मराठवाडा प्रदेशात घुसून सामान्य जनतेवर अत्याचार करायला सुरूवात केली.मग माञ त्याविरूध्द प्रतिकार सुरू झाला.पंडितजी गेलेले होते विदेशात कॕबिनेट बैठकीच नेतृत्व करीत होते सरदार वल्लभाई पटेल ते नाहीत याचा फायदा घेऊन डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्याने १५,१६,आणि १७ सप्टेंबर १९४८ ला सरदार पटेलांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी वायव्य दिशेने औरंगाबाद मधुन, पश्चिम दिशेने सोलापूरहुन, ईशान्य दिशेने आदिलाबादहून, दक्षिण दिशेने कर्नालूनहून आणि आग्नेय दिशेने विजापूरहून अशा पाच दिशांनी हैदराबाद संस्थानात सैन्याच्या तुकड्यांनी प्रवेश केला. आणि पाच दिवसात कासिम रझवी व निजामाच्या सैन्याला पळता भुई थोडी केली.
डाॕ.आंबेडकरांच्या सल्ल्याने त्याला सैनिकी कारवाई नाव न देता त्यांनी त्याला पोलिसी कारवाई नाव दिल. सैनिकी कारवाई दुसऱ्या देशावर होत असते.आमच्या देशातला प्रश्न निर्माण झाला आणि इलाजच उरला नाही तर करावी लागते त्याला पोलिसी कारवाई म्हणतात.सरदार पटेलांच्या कृपेने १७ सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थान मुक्त झाल.निजाम भारत सरकारला शरण आला. म्हणून म्हणावेसे वाटते देशासाठी सरदार लढले निजामाचे निशाण पडले.
तारिख विसरू नका स्वातंत्र्य मिळाल्याच्या १३ महीने नंतर आहे.ते १३ महीने आपण गुलामित होतो हे विसरून चालणार नाही.
काश्मीर मुक्तिसंग्राम भाग - २
आता उरल फक्त ठसठसत काश्मीर राजा हिंदू .काश्मीरच्या राजाला वेगळ काश्मीर करायची इच्छा होती.कारण त्याच्या पूर्वजांनी शीखांच साम्राज्य बुडवायला इस्ट इंडिया कंपनीला मदत केली होती.तो डोग्रा जमातीचा राजा होता.स्वातंत्र्य मिळताना राजा होता हरिसिंग त्याला भारतातही यायच नव्हतं पाकीस्थान मध्येही जायच नव्हतं.महंमद अल्ली जीनांचा आग्रह होता पाकीस्थान मध्ये सामिल व्हा तुम्हाला अंतर्गत स्वायत्ता देवू.महाराजा हरिसिंगला ते मान्य नव्हतं.पुन्हा थोडी घाई नडली पाकीस्थानची काश्मीर बळकावण्यासाठी पुन्हा नाव रझाकारच.रझाकार म्हणजे धर्माची सेवा करणारे ही संकल्पना सगळ्या धर्मामध्ये आहे.तसे हे रझाकार पण नावाला रझाकार शिरायच आणि जनतेवर अत्याचार करायचे.
खर म्हणजे पाकीस्थानी सैन्यच महमंद अल्ली जिनांनी काश्मीर मध्ये घुसवल ते जस जसे पुढे सरकायला लागले तसा महाराजा हरिसिंगचा प्राण वर खाली व्हायला लागला.तेव्हा त्यांनी भारताकडे मागणी केली की तुमची मदत द्या.पुन्हा एकदा सुदैवाने सरदार वल्लभाई पटेल होते.त्यांनी राजा हरिसिंग कडे आग्रह धरला की भारताच्या सामिलीकरणाच्या तहावर सही कर.हा शेवटच्या क्षणा पर्यंत नाही म्हणत होता.भारताच्या सामिलीकरणावर सही केलीस तर भारतीय लष्कर येऊन तुला वाचवील.एक दिवस असा आला १९४८ च्या जानेवारी महीन्यातला आणि आता जो पाकव्याप्त काश्मीर आहे ते तीन प्रदेश आहेत हुंजा(Hunza),स्कार्दू (Skardu),आणि गिलगीट (Gilgit) हे तर गेलेच होते.बारामुल्ला सेक्टर मधून हे रझाकार आतमध्ये शिरलेले.त्यांनी श्रीनगरच रेडीओ स्टेशन ताब्यात घेतल.असा एका मधल्या टेकडीवर राजवाडा होता.त्याला रझाकारांनी वेढा घातलेला होता.एयरपोर्ट तेवढं कसबस शिल्लक होत,आणि राजा हरिसिंगने गुडघे टेकले.
सरदार पटेलांचे दूत महाजन आणी गिरजा शंकर वाजपेय हे त्यावेळचे आपले फाॕरेन सेक्रेटरी हे श्रीनगर मध्ये तळ देऊन होते.ते राजा हरिसिंगला सांगत होते भारताच्या सामिलीकरणावर सही कर तर भारतीय सैन्य येईल.ज्यावेळेला श्रीनगरचा एयरपोर्ट सोडून बाकी सर्व भाग रझाकारानी काबीज केला होता.आता जर श्रीनगर पडल तर हातातून काश्मीर गेला तुला नाही मला नाही घाल कुञ्याला अशी स्थिती होऊन बसणार म्हणून हरिसिंगने भारताच्या सामिलीकरणावर सही केली.त्यावेळी दिल्लीहून भारताची विमान निघाली.ती आहे कुमाऊं रेजिमेंट आणि तीचा कमांडींग आॕफीसर होता कॕप्टन सोमनाथ शर्मा ३०० जन विमानातन पोहचले.विमानानं त्यांना का जाव लागल?कारण आताचा जो जम्मूमार्गे बनिहाल पास काराकोरम रेंजेस,बनिहाल पास मधल्या सगळ्या शिखराला एक बोगदा आहे त्याच नाव नेहरू टनेल आहे.आणि त्या जागेच नाव पटनी टाॕप तिथून उतरतो तो श्रीनगर व्हॕली मध्ये रस्ता उतरतो.हा रस्ता त्यावेळी अस्तित्वातच नव्हता.त्यावेळी श्रीनगर कडे जाण्याचा इस्लामाबाद,पाकीस्थान मधून मुज्जफराबाद मग डोमेंन नावाच ठीकाण आणी तिथून तो श्रीनगरला उतरत यायचा.त्यामुळे भारतीय लष्कराला जायला त्यावेळी रस्ता नव्हता तो नंतर झाला.त्यावेळी जानेवारीचे दिवस बर्फ पडत होता.धुक असत हेलिकॕप्टर कींवा विमान सुध्दा जायला अवघड असत.
अशात पहीले ३०० सैनिक विमानानं पोहोचले.त्यांनी तीन दिवस तीन राञ फक्त विमान तळ लढवल.विमानतळ ताब्यात राहील तर दुसरे भारतीय सैनिक येऊ शकतील.त्या लढाईत स्वतःहा कॕप्टन सोमनाथ शर्मा मारला गेला.स्वतंत्र भारताच पहील परमविरचक्र म्हणजे लष्करातील सर्वोच्च पराक्रमाचा सन्मान कॕप्टन सोमनाथ शर्माला मिळाला.काश्मीर वाचलं.पण ६५ काश्मीरवरनच,७१ काश्मीरवरनच झाल हे विसरून चालणार नाही.१९४८ लढाईच्या वेळेला भारताचे लष्कर प्रमुख जनरल करिअप्पा पंडीतजीना सांगत होते की,फक्त ४८ तास द्या काश्मीर मोकळा करतो.पण पंडीतजींचा युनायटेड नेशन्सवर विश्वास होता.त्यांनी युनायटेड नेशन्सकडे हा प्रश्न मांडला. जो जिथे आहे तेथेच थांबा असे युनायटेड नेशन्सने सांगितले त्यामुळे युद्धबंदी झाली.ज्या सीमा,जे सैनिक जिथे आहेत तिथेच थांबले.त्यामुळे आता आपण भारताचा नकाशा पाहतो तेव्हा हे कधीही विसरून चालणार नाही की वरचा पाकीस्थानच्या बाजूचा १/३ भाग आणि चीनच्या बाजूचाछोटासा भाग आजही भारताच्या प्रत्यक्ष ताब्यात नाही.तो भाग पाकीस्थानच्या ताब्यात आहे.त्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो.ते तीन प्रदेश आहेत.हुंजा,स्कार्दू आणि गिलगीट.पाकीस्थानने त्यातील चीनकडील काही भाग चीनला देणगी म्हणून दिला.मग चीनने त्या भागामध्ये इस्लामाबादहून तिबेटची राजधानी ल्हासाला जाणारा हायवे तयार केला.
तो हिमालयातुन जाणारा हायवे कीती रूंदीचा आहे?एकाच वेळी चार रणगाडे दणदणत जाऊ शकतील ऐवढ्या रूंदीचा हायवे आहे.तो भारताच्या उरावर परमनंट धोका आहे.त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर,आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि शिमला करार कीतीही ठरलेले असो.काश्मीर हा भारत आणि पाकीस्थान मधला म्हणजे दोन देशांमधला संबंध ठेवणे अवघड जाणार आहे.कारण जगाच्या पाठीवरचा काश्मीर हा सगळ्यात प्रक्षोभक विषय मानला जातो.याच कारण हा एकच लढा असा आहे की दोन्ही देशांकडे अणवस्ञ आहेत.जर यांच्यामध्ये लढाई पेटली अन् कोणत्याही एका देशाची पाठ भिंतीला टेकली तर शेवटचा उपाय म्हणून का होईना ते अणवस्ञाचा उपयोग करतील मग अणवस्ञ हा दोन देशातला प्रश्न राहत नाही,कारण त्याच्या रेडीयशनचा परिणाम जगावर असतो.मग जग मध्ये येणार अस युद्ध पेटू नये म्हणून , वाटत."मानवतेचे हे नाते नवे मानवास कळणार आहे.हर एक अज्ञानाकडून विज्ञानाकडे वळणार आहे.ज्ञानाच्या या दिव्य प्रकाशात विषमता जळणार आहे.आणि विश्व शांतीसाठी जग अखेर बुध्दाकडेच वळणार आहे."
लेखक -
शंकर नामदेव गच्चे
( एम. ए. बी. एड.) जि.प. प्रा. शाळा वायवाडी केंद्र पोटा बुद्रुक ता. हिमायतनगर जि. नांदेड मोबाइल नंबर -८२७५३९०४१०
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .