सांगली ( आसमा नदाफ ) :
मदरसा फलाये मिल्लत च्या वतीने ईद मिलादुन्नबी च्या पार्श्वभूमीवर विविध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले.
सदर कार्यक्रमांमध्ये शाळेतील बालचमुनी हुजूर सल्लाहु अलैही वसल्लम यांच्या जीवनी व कार्य आणि सुन्नते अशा वेगवेगळ्या विषयावर भाषण प्रस्तुत केले. शाळेतील एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या मधील 30 विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तू व इस्लामिक पुस्तक हे संस्थेचे सचिव श्री सरवर मुनीरूदिन मुल्ला यांचे तर्फे देण्यात आले
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पाकीजा मस्जिदत चे इमाम जनाब हाफिज अब्दुल रउफ , हाफिज इखलास उमर मस्जिदत चे इब्राहीम भाई, हाफिज इलियास मोहसिन खलिफा आणि जीवन विकास मराठी माध्यमीक प्रशाला चे मुख्याध्यापक श्री कुरणे सर व अल अमिन मराठी प्रायमरी स्कूल च्या मुख्याध्यापिका शहनाज मुल्ला डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम ज्युनिअर कॉलेज सांगली चे मुख्याध्यापक श्री प्रकाश माळी सर व मोठ्या संख्येने पालक व महिला उपस्थित होत्या सर्वांनी विद्यार्थ्यांचा कौतुक व स्तुती केली
संस्थेचे संस्थापक हाजी मुनिरुद्दिन इमाम मुल्ला यांनी मार्गदर्शन केले आणि यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री फारूक अकीवाटे सर व संस्थेचे सदस्य सरवर मुल्ला सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व संस्थेचे ताहीर मुल्ला सर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शबाना नदाफ मॅडम व आसमा नदाफ मॅडम यांनी केले पाहुण्यांचे सत्कार अबूबकर भालदार सर आणि स्वागत अतिक चौगले सर आणि आभार टिपू सुलतान मुल्ला सर यांनी केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन सरामद जनब इमाम उर्दू प्रायमरी स्कूल सांगली च्या मुख्याध्यापिका सौ शाहीन मॅडम यांनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .