लातूर ( शालेय वृत्तसेवा ):
भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने अहमदपूर तालुक्यातील रुई (दक्षिण) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात लातूर जिल्ह्यातील तृतीय व अहमदपूर तालूका मधून प्रथम तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
आज ७२ व्या भरतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने शाळेमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ घेवून गावकरी, शालेय विद्यार्थी, शिक्षक यांचे समक्ष तंबाखू मुक्त शाळा घोषित करण्यात अली. सर्व शिक्षक व विद्यार्थी यानी आनंद व्यक्त केला. सलाम मुंबई फाऊंडेशन तर्फे तंबाखू मुक्त शाळेचे डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त झाले.
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले आहे.
या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक बोईनवाड एस. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल शिक्षक कोटापल्ले एस.जी. यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त अभियान शाळेत राबविले आहे. जि.प.रुई (दक्षिण) शाळेने नवीन वर्षात नऊ दिवसात नऊ निकष पूर्ण करून लातूर जिल्ह्यात *तृतीय* क्रमांक व अहमदपूर तालूक्यातून *प्रथम* क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी , उपशिक्षणाधिकारी दशवंत सर, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे साहेब., शिक्षणविस्ताराधिकारी नानसाहेब बिडवे साहेब,केंद्रप्रमुख मिटकरी साहेब,आदींनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .