शाळा, महाविद्यालयीन आठवणींना उजाळा.. नॅशनल उर्दू माध्यमिक शाळा, सिल्लोड चे माजी विद्यार्थी !
सिल्लोड- सिल्लोड शहरातील मित्रमंडळींचा स्नेहमिलन सोहळा बालदिना निमित्ताने तब्बल २१ वर्षानंतर नॅशनल उर्दू माध्यमिक शाळा,सिल्लोड शाळेचा स्नेहसंमेलन दौलताबाद च्या एका फार्महाऊस वर निसर्गरम्य परिसरात उत्साहात पार पडला. सर्व वर्गमित्र एकवीस वर्षानंतर एकत्र आल्याने सर्व वर्ग मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सर्व वर्गमित्र हे सिल्लोड शहर आणि तालुक्यातील आहे तसेच सिल्लोड शहरातील नॅशनल उर्दू शाळे मधील पहिली ते दहावी चे माजी विद्यार्थी असून नॅशनल उर्दू शाळा, सिल्लोड येथून शाळेतून इयत्ता दहावी वर्ष २००० चे गुणवंत विद्यार्थी असून त्यांनी आज रोजी विविध क्षेत्रात आपल्या शाळेचे व महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे.
कोरोना विषाणूच्या काळात सर्व खबरदारी घेऊन सदरील वर्गमित्र व्हाट्सअप च्या माध्यमातून बालदिनाच्या औचित्य साधून दौलताबाद च्या फार्महाऊस च्या प्रांगणात एकत्रित आले व सर्व शालेय जीवनातील आठवणींना परत एकदा उजाळा मिळाला. जवळजवळ या स्नेहमीलन गेट टुगेदर कार्यक्रमास 45 वर्गमित्र उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी आपल्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला व भविष्यात येणाऱ्या सुखदुःख ला सर्वांनी एकत्रित रित्यासामोरे जाण्याचा निश्चय केला . आपल्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे स्मरण करून त्यांना आपल्या सर्व यशाचे श्रेय देण्यात आले.
सदरील वर्गमित्र 'क्लासमेट' या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जोडलेले आहे व ग्रुपमधील बहुतेक वर्गमित्र वेगवेगळ्या व्यवसायात नोकरीत उद्योग धंद्यात यशस्वी झालेले असून उत्तम रित्या आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत आहे. तब्बल २१ वर्षांनंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले होते व सर्वांचे चेहरे उत्साहाने फुलून गेले होते . याप्रसंगी विविध मनोरंजक खेळ खेळण्यात आले व आपल्यामधील ऋणानुबंध असाच कायम रहावा यासाठी ठराविक कालावधीनंतर हा गेट टुगेदर स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला जावा असा निर्धार यावेळी करण्यात आला...
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .