गेल्या तेवीस वर्षांपासून दरेगावात साजरी होते ज्ञानदीपाची दिपावली..!

शालेयवृत्त सेवा
0




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे गेल्या तेवीस वर्षापासून ज्ञानदीपाची दीपावली हा प्रबोधनात्मक आणि पर्यावरण पूरक ज्ञानोत्सव सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ .हनुमंत मारोतीराव भोपाळे यांच्या संकल्पनेतून साजरा होतो. या कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार, गावातील मुलं मुली आणि बाईलेकींच्या मुलामुलींच्या सप्तगुणांना वाव देण्यासाठी गीतगायन, भाषण आणि कविता वाचन, मेडिकल आणि इंजिनिअरिंगला प्रवेश प्राप्त ठरलेल्या आणि अन्य  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रंथ भेट आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम कार्यक्रम घेण्यात आला..!


सुप्रसिद्ध साहित्यिक बालाजी पेटेकर, डॉ.शिवाजी कागडे, श्रीहरी देशमुख, सुप्रसिद्ध वक्ते पी.बी.वाघमारे, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, उपक्रमशील शिक्षक व्यंकटेश बैस, उत्तम गवाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक मनोगत शुभांगी सोनमनकर, ओंकार पेटेकर , अष्टविनायक देशमुख यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमास गुलाब कदम सोमठाणकर, व्हि.डी. देशमुख गोणारकर केरबा सोनमनकर गुरूजी, संतोष सांळुखे दुगावकर, विष्णू वडजे टेंभुर्णीकर, वसंतराव  वडगावकर, मुधळे सर, संभाजी पा. शिंदे, माजी सरपंच देवीदास भोपाळे, तुकाराम पाटील शिंदे, विठ्ठल  शिंदे, गुणवंतराव आमनवाड, तेजेराव शिंदे, बापूराव चिंचाळे, दादाराव चिंचाळे, आनंदा शिंदे, रामेश्वर घोनशेटवाड, मारोतीराव शिंदे, के.डी.शिंदे, रामदास शिंदे, बाबुराव कानगुले, नामदेव शिंदे, दिगंबर घोनशेटवाड, दिगंबर भोपाळे, केरबा भोपाळे, रमेश भोपाळे, नरहरी कानगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.


या प्रसंगी बोलताना बालाजी पेटकर म्हणाले की, ही ज्ञानाची दीपावली म्हणजे वैचारिक मेजवानी असून या कार्यक्रमाचे सर्व गावांनी अनुकरण केले पाहिजे. मी स्वतः असा कार्यक्रम पुढील वर्षीपासून सुरू करणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. कोलंबीचे माजी सरपंच उत्तम गवाले म्हणाले, कमी लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात प्रेरणादायी आणि प्रबोधनात कार्यक्रम गेल्या तेवीस वर्षांपासून साजरा होतो, याचे आम्ही साक्षीदार आहोत. आज ग्रामीण भागात अन्नदानापेक्षा ज्ञानदानाची आवश्यकता आहे. समाजाची वैचारिक भूक भागवणारा, प्रेरणादायी कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे. व्यंकटेश बैस म्हणाले, प्रेरणा बाजारात मिळत नसतात ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आज प्रोफेसर पदापर्यंत पोहोचले आणि उपक्रमशील व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ हनुमंत भोपाळे यांनी हा जो ज्ञानयज्ञ गेल्या तेवीस वर्षांपासून सुरू ठेवला ही गोष्टच सर्वांना प्रेरणा देते. गावाचं काही तरी आपण देणं लागतो ही भावना घेऊन डॉ हनुमंत भोपाळे घेत आहेत, याची प्रेरणा घेऊन आपणही काही केले पाहिजे म्हणून आम्ही यावर्षीच विशाल मुधळे यांच्या स्मरणार्थ प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.


 पी.बी.वाघमारे यांनी ग्रामीण भागातील युवक युवतींना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली तर ते यशोगाथा निर्माण करू शकतात. यासाठी सातत्याने प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत, असे सांगितले. युवा साहित्यिक सोनू दरेगावकर म्हणाले, मी माझ्या किशोर जीवनापासून कार्यक्रमात दरवर्षी भाषण करत आलो आहे. सभाधीटपणा मला प्राप्त झाला. असून आता मी हजारो लोकांसमोर बोलू शकतो. संभाजी पा. शिंदे यांनी आमच्या गावात आमच्या गावचा भूमिपुत्र डॉ हनुमंत भोपाळे सलग तेवीस वर्षांपासून कुणाकडूनही पाच पैस न घेता कार्यक्रम आयोजित करत आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो असे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आमचा सत्कार  झाल्यामुळे पुढील यशासाठी  प्रोत्साहन मिळाले असे सांगून विद्यार्थींनी अभ्यास करून मोठे झाले पाहिजे असे सांगितले.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हनुमंत भोपाळे यांनी केले तर आभार प्रदीप शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास दरेगाव आणि दरेगाव परिसरातील श्रोते उपस्थित होते..!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)