नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
दि 1 नोव्हेंबर 2021 हा दिवस हा काळा दिवस म्हणून देशातील नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत आलेले सर्व कर्मचारी हा दिवस पाळतात. महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचार्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना बंद केली सुरूवातीला डीसीपीएस नावाने अंशतः पेंशन योजना सुरू केली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याने त्यास कर्मचार्यांनी विरोध केला म्हणून ती बंद करुन आता नव्याने एनपीएस नावाने योजना सुरू केली असली तरी ती सुद्धा फसवी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व फसव्या पेंशन बंद करून जुनी पेन्शन मिळावी यासाठी देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांना शिक्षक सहकार संघटनेचे राज्य संघटक रवी ढगे यांनी या मागणीसाठी विशेष लक्ष केंद्रित करावे लोकसभेत समान काम समान वेतन हा ठराव संमत करून महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देशातील नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झाले त्या सर्वांना जुनी पेन्शन देऊन द्यावी असे विनंती पत्र रवी ढगे यांनी या अगोदर 3 पत्र पाठवले होते.
आता तरी या पत्राची दखल घेऊन आम्हा सर्व कर्मचार्यांची दिवाळी गोड करावी ही विनंती सुद्धा केली आहे. पत्राच्या प्रति भारत सरकारच्या मा. वित्त मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सुद्धा पाठवल्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .