शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या विनाविलंब अद्यावत करून देवू..
- उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.शेखर कुलकर्णी
नांदेड ( मिलिंद जाधव ) :
इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे, कार्याध्यक्ष मा.वसंतराव मोरे,उपाध्यक्ष मा.माधवराव कांबळे, सरचिटणीस मा.निलेश गोधने, मा.मा.रामदास गोणारकर, मा.राजेश्वर डोमशेर, मा.राम अनंतवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.सौ.सविता बिरगे मॅडम व उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.शेखर कुलकर्णी साहेब यांची भेट घेवून शिक्षकांच्या चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी जुजबी कारणांनी नाकारण्याची प्रकरणे व शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्यांतील त्रुटीबाबत कालबध्द, ठोस व निर्णायक उत्तर व प्रतिसांदाबाबत चर्चा केली व ठाम आश्वासन घेवून दालन सोडले.
शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.सौ.सविता बिरगे मॅडम यांच्याशी चर्चा करताना शिक्षकांचे चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव १)प्रस्तावावर गशिअ साहेबांची स्वाक्षरी नाही २)आडवा तक्ता नाही ३) खातेनिहाय चौकशी प्रपत्र नाही ४)प्रस्ताव नाही ५)आडव्या तक्तयावर गशिअ यांची स्वाक्षरी नाही ६)कागदपत्र अपुर्ण आहेत ७)निवडश्रेणी प्रस्ताव अपात्र ८)प्रस्तावावर स्वाक्षरी नाही व इतर जुजबी कारणे देवून शिक्षकांना चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीच्या लाभापासुन वंचित ठेवण्याचा घाट घातला जात आहे. सर्व पात्र शिक्षकांना न्याय मिळायला या कामी शिक्षकांना वेठीस धरणाऱ्यांवर उचित कारवाई करावी. अशी मागणी केली. शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.सौ. सविता बिरगे मॅडम यांनी चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी प्रदान करावयाचे सर्व प्रस्ताव पुर्नरावलोकन व दुरूस्ती साठी तात्काळ गशिअ यांना परत पाठवून सर्व पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी प्रदान करू. शिक्षकांचे चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीसह सर्व प्रश्न संबंधी विभागप्रमुखांची कालबध्द नियोजन जबाबदारी निश्चिती करूनच पुर्णत्वाला नेवू असे स्पष्ट आश्वासन दिले.
उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.शेखर कुलकर्णी साहेब यांची भेट घेवून अक्षम्य विलंबांनी पण अतिशय गाजावाजा करून वितरीत केलेल्यां पावत्यांत कांही महिन्यांच्या रक्कमा जमा नाहीत. या भविष्य निर्वाह निधींच्या पावत्यांत अनेक दुरूस्त्या आहेत तर अनेकांना पावत्यांच मिळाल्या नाहीत. दरवर्षी उशीरा मिळणाऱ्या भविष्य निर्वाह निधींच्या पावत्यांत व त्यातील अनेक दुरूस्त्या ही जिपची प्रतिमा कमालीची मलीन करीत असुन या बाबत तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात योग्य तो वापर करून पारंपारीक पद्धतीने लेखे आणा भरा दया यात बदल करून ऑनलाईन पध्दतीने भविष्य निर्वाह निधीचे हप्ते DDO- 1,2,3 ने Feeding करणे व संबंधितांना बँकासारखी मेसेज अलर्ट सुविधा, GPF बॅलेंस चेक करता आले पाहिजे व संबंधित खातेदारांना दिलेल्या पासवर्डच्या सहाय्याने कुठेही अन कितीदाही भविष्य निर्वाह निधींच्या पावत्या Download करता याव्यात यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील कांही जिल्हां परिषदां या तंत्रज्ञांनाचा वापर करीत आहेत.आपल्या शेजारची लातूर जिल्हा परिषद याचे ज्वलंत उदाहरण आहे.
या प्रसंगी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.शेखर कुलकर्णी साहेब यांनी या यंत्रणेत असलेल्या त्रुटी दूर करू, शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या तात्काळ दुरूस्ती करून देवू. या कामी विशेष लेखा कर्मचारी नियुक्त करून तात्काळ मिसिंग हप्त्यांबाबत संबंधित खातेदार शिक्षकांनी स्वतः शेड्यूलच्या सत्यप्रतींसह अर्ज करावा. त्यांना तात्काळ दुरूस्त केलेली पावती मिळेल.
आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात बाबा आदमच्या जमान्यात राहून चालणार नाही. आपण कॅम्प्युटराईजच करणे पुरेसे नाही. इतर जिपंचा अभ्यास करून नांदेड जिपही आधुनिक साफ्टवेअरचा वापर करून ऑनलाईन सुविधां देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. यां बाबत मुकाअ मॅडम व लेखा विभाग अनुकुल सर्व बाबींवर विचारविनिमय करून ठोस निर्णय घेतला जाईल. अशी हमी दिली. तर शिक्षकांचे नुतन वर्षात म्हणजे जानेवारी देय फेब्रुवारीचे वेतन CMP प्रणाली द्वारे शिक्षकांच्या थेट वेतन खात्यात जमा केले जातील. CMP ची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .