बालकांना परिकथेत अडकवण्याऐवजी वास्तववादी व विज्ञानवादी बालसाहित्याची निर्मिती होणे आवश्यक - नटराज मोरे

शालेयवृत्त सेवा
0

 



दिवंगत साहित्यिक प्रकाश साखरे यांच्या स्मरणार्थ आयोजित ' प्रकाशतारा ' शिक्षक-विद्यार्थी काव्यसंमेलन व पुस्तक प्रकाशन !


कोल्हापूर ( शालेय वृत्तसेवा ) :

बालसाहित्य हे काल्पनिकतेपेक्षा वास्तव्यवादी असणे ही आजची गरज आहे. बालकांना परी कथेत अडकण्यापेक्षा त्यांच्यासाठी वास्तव व विज्ञानवादी साहित्य निर्मिले जाणे आवश्यक आहे. परिकथांमुळे भ्रामक कल्पनेत अडकल्यामुळे वास्तव व विज्ञानवादापासून बालके मागे राहतात म्हणून साहित्यिकांनी साहित्याची निर्मिती करतांना बालकांच्या विचारांना चालना मिळेल आणि देशासाठी एक सुजाण व विचारी नागरिकांची भावी पिढी तयार होईल असे साहित्य तयार करावे असे विचार अखिल भारतीय शिक्षक साहित्य-कला-क्रीडा मंडळ कोल्हापूर जिल्हा शाखा आयोजित दिवंगत साहित्यिक, समिक्षक तसेच मंडळाचे राज्य सचिव दिवंगत प्रकाश साखरे सर यांच्या स्मरणार्थ आयोजित प्रकाशतारा या शिक्षक-विद्यार्थी काव्यसंमेलन व पुस्तक प्रकाशन प्रसंगी मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे यांनी व्यक्त केले.


      राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर नगरीला दिलेला साहित्य-कला-क्रीडाचे वारसा येथील जनतेने जपला आहे. त्याची झलक राष्ट्रीय पातळीवरही बघायला मिळते असेही ते पुढे म्हणाले.


     करवीर नगर वाचनालयाच्या ऐतिहासिक सभागृहात भरलेल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत निकाडे होते तर प्रमुख अतिथी राज्य सचिव विजय जोगमार्गे, राज्य सहसचिव  डॉ श्रीकांत पाटील, राज्य प्रसिद्धी प्रमुख सचिन कुसनाळे, पुणे विभागीय अध्यक्ष तानाजी आसबे, विभागीय उपाध्यक्षा आरती लाटणे, बेळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खामकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संयोगिता महाजन इ. मान्यवर उपस्थिती होते.


     जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत निकाडे यांनी विचार व्यक्त करतांना सांगीतले की, महत्वपूर्ण आशय असणारी कविता कमी शब्दांत मांडावी लागते. साहित्य वाचनलयातून वाचकांना जगण्याची प्रेरणा मिळते. कविता आणि साहित्याचा मेळ घातल्यास  सर्वोत्तम होते.  मंडळाचे राज्य सचिव विजय जोगमार्गे आणि राज्य सहसचिव डॉ श्रीकांत पाटील यांनीही आपले  विचार व्यक्त केले.


    यावेळी कवी अजयकुमार वंगे सर लिखित 'गाणी चिमुकल्यांची' आणि काव्य संमेलनात सहभागी कविंचे जिल्हाध्यक्ष संयोगिता महाजन संपादित 'प्रकाशतारा' या  पुस्तकाचे प्रकाशन तसेच राज्य कमिटीतर्फे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ श्रीकांत  पाटील यांच्या लाॕकडाऊन यांचा कादंबरीच्या भरीव यशाबद्दल त्याचप्रमाणे नवनियुक्त विभागीय अध्यक्ष तानाजी आसबे, उपाध्यक्षा आरती लाटणे आणि  नवनियुक्त कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संयोगीता महाजन, उपाध्यक्ष परशराम आंबी, गीता घाटगे, सचिव गुलाब बिसेन यांच्यासह नवनियुक्त जिल्हा कार्यकारी मंडळ यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 


      मंत्रमुग्ध करणाऱ्या या काव्यसंमेलनात एकापेक्षा एक सरस आशा कविता सादर करुन सहभागी कवींनी रसिकांची दाद मिळवली. सर्व कवींना सन्मानपत्र देऊन संन्मानीत करण्यात आले.


      या नियोजनबद्ध कार्यक्रमाचे प्रास्तविक संयोगीता महाजन तसेच सुरेख असे सूत्रसंचालन गीतांजली खोत व सुरेखा कुंभार यांनी केले.  यावेळी अरुण सुनगार, उर्मिला तेली, भिवाजी कांबळे, जैनब शेख, विद्या काटकर. शांतीनाथ इंगळे, पदाधिकारी, कवी, बालकवी, रसिक श्रोते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)