सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
निपुण भारत अभियाना अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे "आयोजन दिनांक 20 डिसेंबर 2021 ते 22 डिसेंबर 2021 या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .
या स्पर्धांमध्ये वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गणिती उखाणे, प्रश्नमंजुषा, गणितीय कोडे, गणित शैक्षणिक साहित्य निर्मिती , प्रदर्शन, खाद्य बाजार व गणित मेळावा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक स्पर्धेमधून तीन क्रमांक काढून त्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वही-पेन, चित्रकला वही, स्केचपेन इत्यादी बक्षीस वाटप करण्यात आले.
सदर बक्षिसे ही गणित विषयाच्या शिक्षिका सौ. अस्मा अमजदखान नदाफ यांच्याकडून देण्यात आले. सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक हाजी मुनीरूद्दीन इमामसो मुल्ला संस्थेचे अध्यक्ष एफ.एम अकिवाटे व सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .