RTE 25% आरक्षित जागेवरील प्रवेशाबाबत

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

पंचायत समिती नांदेड अंतर्गत RTE प्रवेश प्रक्रिया १३ एप्रिल पासून प्रवेश प्रक्रिया सूरु असून कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत २२ मे आहे.




सध्या स्थितीत आज पर्यंत एकूण शहरी 585 पैकी 399 प्रवेश तर ग्रामीण एकूण 361 पैकी 262 प्रवेश झालेले आहेत. अद्यापही बऱ्याच पालकांनी पडताळणी समितीकडे संपर्क केला नसून आर टी ई 25% आरक्षित जागेवरून प्रवेश करण्यासाठी तात्काळ पंचायत समिती नांदेड येथे पडताळणी समितीकडे संपर्क करावा व प्रवेश निश्चित करून घ्यावा तसेच संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाने आपल्या शाळेत प्रवेश पात्र पाल्यांचा पालकांना याबाबत कळवावे व कोणताही पाल्य प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन नागराज बनसोडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)