मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा पुढाकार
शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील ५० विद्यार्थी यांची निवड "इस्रो" येथील शैक्षणिक सहलीसाठी करण्यात आली. हे सर्व विद्यार्थी आज दिनांक १४/५/२०२३ रोजी सहलीला रवाना झाले. यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे पालक उपस्थित होते.
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड जिल्हा परिषद शाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर झालेल्या परीक्षांमधून 50 विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगळुरू येथे सहलीसाठी निवड करण्यात आली असून, रविवार, १४ मे रोजी हे विद्यार्थी सहलीसाठी रवाना होणार आहेत. जिल्ह्यात शाळास्तरावर झालेल्या परीक्षेला 74 हजार 744 विद्यार्थी सामोरे गेले होते. यात प्रत्येक तालुक्यातील तीन, अशा एकूण 50 जणांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था व परिसरातील
विविध वैज्ञानिक स्थळांना भेट देण्यासाठी निवड झाली आहे. 14 मे रोजी 50 विद्यार्थी, शिक्षण विभागातील.... अधिकारी आणि .... शिक्षक, असे एकूण 60 जण विमानाने रवाना होणार असून, 22 मे रोजी नांदेडला परत येणार आहेत. या सहलीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था, तसेच परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ब्लेझर, शूजसह हवाई सफरीचा खर्च जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात येणार आहे. विभागीय
आयुक्तांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यामध्ये शाळास्तरावर 74हजार 744 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तसेच केंद्र स्तरावर 20,000 व तालुकास्तरावर १ हजार 900 आणि जिल्हास्तरावर गुरूकुल ईग्लीश मिडियम स्कूल ,नांदेड येथे १० मार्च रोजी झालेल्या परीक्षेला १६७विद्यार्थी सामोरे गेले. यातील प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण घेणारे तीन विद्यार्थी हवाई सफरीसाठी निवडण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समिती फंडातून आणि मा पालकमंत्री व विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार या सहलीसाठी खर्च करण्यात येणार असून, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर- घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, अवधूत गंजेवार, बंडू आमदूरकर, संतोष शेटकार यांच्या मार्गदर्शनाखाली १४ मे ते २२ मे या कालावधीत सहलीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॕ.सविता बिरगे यांनी दिली.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .