केंद्रप्रमुखाच्या विभागीय स्पर्धा परीक्षेतून होणार नियुक्ती : शिक्षकांचा अभ्यास सुरू !

शालेयवृत्त सेवा
0

राज्यातील 2000 शिक्षकांसाठी केंद्रप्रमुखाचे वाट मोकळी ..



पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यातील 2384 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्याची वाट मोकळी झाली आहे. केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या नियुक्त्या होणार आहेत. त्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदेचे गुरुजी आता अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. यातून केंद्रप्रमुखाचे पदे भरण्यात येणार आहेत या परीक्षेसाठी सहा जून पासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. अर्जासाठी 15 जून ची मुद्दत देण्यात आली आहे.



या शिक्षकांना देता येणार परीक्षा :

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाने बी ए / बी कॉम / बीएससी यापैकी एक पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण आवश्यक आहे. प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास ही पदवी धारण केली तेव्हापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतके नियमित सेवा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षे आहे.



केंद्रप्रमुखांच्या जिल्हानिहाय जागा :

नाशिक १२२ नंदुरबार ३३ धुळे ४० जळगाव ८० अमरावती 69 बुलढाणा 65 अकोला 42 वाशिम 35 यवतमाळ 90 नागपूर 68 वर्धा 43 भंडारा तीस गोंदिया 42 गडचिरोली 50 चंद्रपूर 66 छत्रपती संभाजीनगर 64 हिंगोली 34 परभणी 43 जालना 53 बीड 78 लातूर 50 धाराशिव 40 नांदेड 87 ठाणे 47 रायगड 114 पालघर 75 पुणे 153 अहमदनगर 123 सोलापूर 99 कोल्हापूर 85 सांगली 67 सातारा 111 रत्नागिरी 125 आणि सिंधुदुर्ग 61

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)