नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विदयार्थी लाभाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये मोफत गणवेश वाटप या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथील अकरा विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपात निवड करण्यात आली होती.
आज शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थीना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अबचलनगर नांदेड येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद नांदेड च्या कर्तव्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशानुसार नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथील सारिका तारू, दिवेश गोमसाळे, रोहन दुथडे, मानसी तारु, कैकशा गुलाम अहमद, सम्राट तारु, अश्मिरा शेख, आर्फिया शेख, अल्फिन शेख, राहिला खैसर, बुशरा शेख या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
यासाठी वाजेगाव बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक बाबुराव जाधव यांनी पुढाकार घेऊन उत्कृष्ट नियोजन केले. त्यांना शाळेतील सौ सीमा बोबडे, सौ मुक्ता गोरगिळे, श्री सलीम शाहजाद, श्री. मुद्दसर अहमद, युसुफ सर व सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .