नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नांदेडच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी आकस्मिक भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांसी संवाद साधला.
शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा पूर्व तयारी मेळावा दुसरा आणि इयत्ता पहिली प्रवेशित मुलांचे स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आला होता. या कार्यक्रमाला नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे या उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते इयत्ता पहिली मधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक वृक्षरोप भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी श्री. षटकार, किनवट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, इस्लापूर बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी श्री मेकाले तसेच शिवनी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड उपस्थित होते.
त्यानंतर श्रीमती बिरगे मॅडम यांनी जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्याशी शैक्षणिक विषयक मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन दिले. तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार इस्लापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.जी. पाटील यांनी केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .