जि.प.हायस्कुल जवळगाव शाळेचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश!

शालेयवृत्त सेवा
0

 



मन्मथ प्रभाकर पटणे हिमायतनगर तालुक्यात पहिला!


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

सन 2022-23 मधील इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. ह्या परीक्षेमध्ये हिमायतनगर तालुक्यातील जि.प.हायस्कुल जवळगाव शाळेचे मन्मथ प्रभाकर पटणे, यशश्री संतोषसिंह ठाकुर, पवन सुनील पांचाळ, संदेश माधव सोंडाबे हे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. सदरील विद्यार्थी आठवीच्या एन. एम.एम.एस.परीक्षेतही शिष्यवृत्तीधारक झाले होते. ह्या दुहेरी यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


या विद्यार्थ्यांना विषयशिक्षक चंद्रकांत कदम, वसंत गोवंदे,रमेश माळगे, वैजनाथ चेपूरवार, महेश पडगीलवार, संगमनाथ मुंडकर, श्रीमती सुरेखा कमळू, श्रीमती सारिका येरमवार, श्रीमती सुरेखा गुरुफळे, श्रीमती वंदना ढोकाडे, श्रीमती वैशाली मुस्कावाड, युनिक कोचिंग क्लासेसचे संचालक प्रसाद रावते सर, लक्ष्मण बंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.डी.बी.शिराळे, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत,ग्रामस्थ व पालकांनी  अभिनंदन करून भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)