मंगळ ग्रहावरचा सूर्यास्त विरुद्ध पृथ्वीवरचा सूर्यास्त

शालेयवृत्त सेवा
0

◾ मंगळ ग्रहावरचा सूर्यास्त विरुद्ध पृथ्वीवरचा सूर्यास्त 


"लाल ग्रहावर सूर्यास्त निळा दिसतो आणि निळ्या ग्रहावर सूर्यास्त लाल दिसतो" असे वाक्य जरी म्हटले तरी ते बऱ्याच अर्थी योग्य आहे. 


पृथ्वीवर बहुतांश भाग समुद्र असल्याने अवकाशातून बघताना पृथ्वी निळ्या रंगाची दिसते. 


तेच मंगळ ग्रहावर समुद्र नाही आणि जमीन सुद्धा तांबड्या रंगाची लोह क्षरण झालेली आहे त्यामुळे मंगळ ग्रह लालसर दिसतो. 





पृथ्वीवर ऑक्सिजन आणि नायट्रोजन वातावरणातील मुख्य वायू आहेत, या शिवाय क्षितीजाच्या जवळ सूर्य असताना सूर्याचा प्रकाश वातावरणाच्या, धूलिकणांच्या दाट थरांतून येत असल्याने इतर सर्व रंग विखुरतात आणि केवळ लालसर रंगाच्या छटा आपल्या पर्यन्त पोहोचतात म्हणून सूर्य क्षितीजाच्या जवळ असताना लालसर दिसतो. 


हेच मंगळ ग्रहाच्या बाबतीत मात्र तिथे वातावरण घनता पृथ्वीच्या वातावरण घनतेच्या केवळ 0.1% असल्याने क्षितीजाच्या जवळ सूर्य गेला तरी सुद्धा त्याचे किरण प्रखरतेने येताना दिसतात. जमिनीजवळ असलेल्या धूलिकणांतून इतर रंग विखुरतात आणि केवळ निळसर पांढरा रंग पार होतो म्हणून तिथून सूर्यास्त/सूर्योदय बघितला तर तो निळसर पांढऱ्या रंगाचे आकाश असल्या सारखा दिसतो.  


नासाच्या रोव्हर कॅमेऱ्याने असाच सूर्यास्ताचा एक फोटो काढलेला वरच्या फ्रेम मध्ये दिसत आहे. 

खालच्या फ्रेम मध्ये आपल्याला रोजचा परिचित असा मोबाईल कॅमेरा ने काढलेला सूर्यास्ताचा फोटो आहे. 


सूर्य हा पांढऱ्या रंगाचा तारा असल्याने केवळ अवकाशातूनच त्याचा नेमका रंग दिसतो.


विविध ग्रहांवर वातावरण आणि धूलिकण यांचे प्रमाण किती त्या नुसार त्या ग्रहावरून दिसणारा सूर्याचा रंग बदलत असतो. 

ग्रहावर जमीन असेल तर क्षितिजापासून किती उंचीवर सूर्य आहे या वरून सुद्धा तिथून दिसणारा सूर्याचा रंग बदलत जातो. 


आपल्या चंद्रावर वातावरण नाही आणि हवेत धूलिकण सुद्धा नगण्य त्यामुळे तिथून सूर्यास्त / सूर्योदय च्या वेळी सुद्धा सूर्याचा रंग पांढराच दिसतो. 


▪️साभार : आकाशातील गमती जमती (facebook Page)

----------------------------------------------

@followers

वरील माहिती आवडल्यास शेअर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)