५३ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके..

शालेयवृत्त सेवा
0


 


नवी मुंबई समग्र शिक्षा ( शालेय वृत्तसेवा ) :

अभियानांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनुदानित शाळांतील ५३ हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार आहेत. ही पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी मिळावीत म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलमध्ये दाखल झालेल्या पुस्तकांचे सोमवारपासून शाळांना वाटप करण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत इयत्ता पहिली आठवीपर्यंतच्या ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्यामुळे पालकांचा मुलांच्या पाठ्यपुस्तकांवरील खर्चाचा भार कमी झाला आहे.


नवीन शैक्षणिक वर्षास येत्या १५ जूनपासून प्रारंभ होत आहे. अगदी पंचवीस दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने शिक्षण विभाग आणि बालभारतीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यासाठी तयारी करून पनवेल येथील व्ही. के. हायस्कूल येथून वितरणास प्रारंभही सुरू केला आहे.


चार विषय एकाच पुस्तकात :

▪️चार वर्षापासून दप्तराचे ओझे कमी करण्याच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकांमध्ये काही प्रमाणात पूर्वी बदल करण्यात आले होते.


▪️पहिली ते सातवीपर्यंतच्या इयत्तेसाठी एकात्मिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये ४ विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात आले होते. त्यामध्येच लिहिण्यासाठी वहीच्या पानांचा समावेश केला होता.


▪️पूर्वी शिक्षण विभागाने सत्रनिहाय बुकची रचना केली होती. मात्र, ही पद्धत बंद करून यंदा शिक्षण विभागाकडून 'जैसे थे' यंत्रणा राबवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)