नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
दिनांक 16 जून 2025 रोजी सोमवार, 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशां नुसार स्थानी स्वराज्य संस्थेच्या शाळेला लोकप्रतिनिधी ची भेट या उपक्रमा अंतर्गत आज नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणलार साहेबाना यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांनी भेट दिली.
तरोडा बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय रुस्तुमजी आडे साहेब, निळा बिट च्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय लता कौठेकर मॅडम,निळा केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री कामाजी डांगे सर, ग्रामपंचायत निळा चे सरपंच प्रतिनिधी रोहित हिंगोले, उपसरपंच नागोराव पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद जोगदंड,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव जोगदंड,उपाध्यक्ष शंकर कदम,गोविंदराव हिंगोले, स्वाती हिंगोले,किशन जोगदंड, पहिली प्रवेश पत्र विध्यर्थ्यांच्या माता मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, त्या नंतर संध्याताई कल्याणकर यांचे आमच्या शाळेच्या वस्तीने साडी,शाल आणि पुष्पगुछ देऊन आमच्या विस्तार अधिकारी कौठेकर मॅडम यांनी स्वागत केले,आणि मॅडम चे स्वागत आमच्या पहिलीच्या वर्गशिक्षिका आदरणीय गंजेवार मॅडम यांनी केले, नवागत विध्यर्थ्यांचे स्वागत आदरणीय संध्याताई कल्याणकर यांनी पुष्पगुछ, पुतक, पेन्सिल, चॉकलेट देऊन केले आणि त्यांच्या समक्ष विध्यर्थ्यांच्या हाताचे ठस्से उमटवण्यात आले.
प्रवेश प्रक्रियेतील सर्व सातहीं टेबल चे सुशोभीकारण करून विध्यर्थ्यांची बौद्धिक क्षमता तपासणी,कृतियुक्त खेळ,घेण्यात आले.प्रवेशित झालेल्या विध्यार्थ्यांची सेल्फी पॉईंट वर फोटो घेण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक,पहिली ते सातवी चे 210 विदयार्थी पहिल्या दिवशी उपस्थित होते,अश्या रीतीने आमच्या शाळेत शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला. उपस्थिती मान्यवरांचे आभार आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कैलास पोहरे सर यांनी केले. '
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .