नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
दि. 16 जून विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आज शाळेची घंटा वाजली त्याचप्रमाणे नांदेड महानगरपालिकेच्या PMSHRI मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा वजीराबाद नांदेड शाळेची सुद्धा घंटा वाजली. शालेय शिक्षण विभागाच्या पत्रकानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आदेश होते त्यानुसार नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. डॉ. महेशकुमार डोईफोडे उपायुक्त श्री. नितीन गाढवे शिक्षणाधिकारी श्री. व्यंकटेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला.
सर्वप्रथम पहिली वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांना फेटा बांधला गेला अगदी अतिथी सारखं त्यांचं सुरुवातीला शाळेच्या गेटवरच स्वागत केलं गेलं या स्वागतासाठी नांदेड महापालिकेचे उपायुक्त श्री. नितीन गाढवे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शाळेत आणण्यात आले आणि उपायुक्त श्री. नितीन गाढवे महापालिकेचे श्री. गणेश नागरगोजे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. दीपिका ताई सावळीकर उपाध्यक्ष श्री. प्रकाश गजभारे व इयत्ता पहिलीतील प्रवेशित विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक, शालेय गणवेश, बूट सॉक्स, स्कूल बॅग, व इतर शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. परमेश्वर माहुरे यांनी आपले प्रास्ताविक मांडले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शाळेच्या सर्व वैशिष्ट्यपूर्ण बाबी मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिल्या म्हणजेच शासनातर्फे गणवेश आणि पाठ्यपुस्तक जरी मिळत असतील तरी इतर शैक्षणिक साहित्य आम्ही शाळेतर्फे विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पुरवतो याही गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नितीन गाढवे यांनी आपल्या मार्गदर्शनात शाळेचे कौतुक केले आणि येणाऱ्या वर्षात या शाळेला नक्कीच दहावी वर्गासाठी मान्यता देऊन माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केली जाईल व शाळेसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले त्यानंतर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या कागदावर पाऊल खुणा घेण्यात आल्या व त्यांचा बौद्धिक विकास सामाजिक विकास गुणात्मक विकास हे पहात त्यांचे पूर्वज्ञान जाणून घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. तानाजी केंद्रे यांनी केले शेवटी एकंदरीत प्रवेशोत्सव कार्यक्रम हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. परमेश्वर माहुरे व शिक्षक श्री. मगरे श्रीमती. उन्हाळे श्री. चांदणे श्री. केंद्रे श्रीमती. वडजे श्रीमती. पतंगे श्री. कदम श्री. यम्मेवार श्री. देवकते श्री. पवार श्री. निखिल सर व सेवक श्री. धनमने श्री. खिल्लारे श्रीमती. गिरी व सर्व पालक यांनी श्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .